22 November 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

लष्कराचा जीव धोक्यात घालण्यापूर्वी S-400 मधील चायनीस सॉफ्टवेअरची पडताळणी करावी - भाजप खासदार

S400 Missile Defence System,  BJP MP Subramanian Swamy

नवी दिल्ली, ३० जून : सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांशी चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील S-400 देण्यास रशियानं सहमती दर्शवली आहे. यापूर्वी हे अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते.

२०२४ पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देणार आहे, अशी माहिती रशियातील वृत्तपत्र Kommersant नं दिली आहे. तत्पूर्वी, रशिया दौर्‍यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक बोरिसोव्ह यांनी भारताला लवकर शस्त्रास्त्र पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. भारत आणि रशिया यांच्यात विशेष सहकार्य आहे आणि भारताबरोबरचा करार जलद पूर्ण होईल असं त्यांनी आश्वासन दिल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.

दरम्यान, भारत सरकारने नुकताच ५९ चिनी अँप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावर भाजपच्या मोठ्या नेत्याने दुसरी मागणी केली आहे जी S-400 अ‍ॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमशी संबंधित आहे. भाजपचे खासदार सुब्रमणियम स्वामी यांनी म्हटलं आहे की, “चायनीस अँप्सवर बंदी घातल्यानंतर भारत सरकारने अपल्या लष्कराचा जीव धोक्यात घालण्यापूर्वी S-400 संबंधित सॉफ्टवेअर आणि अँप्सची पडताळणी करावी”

काय आहे नेमकं ट्विट;

 

News English Summary: After ban of Chinese Apps in social media the Govt should check Chinese software and apps in S400 before risking our armed forces said BJP MP Subramanian Swamy.

News English Title: Modi Govt should check Chinese software and apps in S400 before risking our armed forces said BJP MP Subramanian Swamy News latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x