21 April 2025 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

ट्विटरच्या कायदेशीर उत्तरानंतर मोदी सरकार संतप्त | ट्विटरच्या अधिकाऱ्यांना अटक करण्याचा इशारा

Modi govt, warning to senior Twitter

नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी: सोशल मीडियासंबंधित मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरने केंद्र सरकारच्या निर्देशाला उत्तर दिले आहे. ट्विटरने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले, ‘कंपनीने ५०० पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट्स कायमस्वरूपी बंद निलंबित केले आहेत, ते स्पॅमच्या श्रेणीत येत होते आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर करत होते. त्याशिवाय वादग्रस्त हॅशटॅग्जही हटवण्यात आले आहेत.

ट्विटरने म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तीन वेगवेगळ्या आदेशांत शेतकरी आंदोेलनाशी संबंधित एकूण १४३५ अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते. त्यापैकी काही अकाउंट्स फक्त भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. कंपनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे आणि अलीकडेच केंद्र सरकारने ज्याआधारे ट्विटर अकाउंट्स बंद करण्यास सांगितले होते ते भारतीय कायद्यांस अनुरूप आहे असे आम्हाला वाटत नाही. भारत सरकारने शेतकरी आंदोलनासंदर्भात चिथावणीखोर मजकूर पसरवणारे अनेक अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश दिले होते. सरकारने म्हटले होते की, हे हँडल्स पाक समर्थित, खलिस्तान समर्थकांचे असून विदेशातून ऑपरेट होत आहेत.

भारत सरकारने अलीकडेच ज्या ट्विटर खात्यांवर बंदी घातली त्यामधील काही खाती ट्विटरनेही प्रतिबंधित केली आहेत. पण ही कारवाई फक्त भारतापुरती मर्यादित आहे. नागरी समुदाय, राजकारणी आणि माध्यमांची खाती ट्विटरने रोखलेली नाहीत तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कास आम्ही देशाच्या कायद्यानुसार बांधील आहोत असं ट्विटरने बुधवारी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. भारतीय कायद्यांचे पालन करुन अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवतानाच इतर काही पर्यायांचा आम्ही विचार करीत आहोत, असंही ट्विटरने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने ट्विटरवरील प्रक्षोभक माहिती प्रसारित करणारी अकाउंट्स सेंसर करण्याची मागणी केली होती. परंतु ट्विटरकडून त्याकडे काणाडोळा करण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यावरून सरकारने आपली भूमिका कठोर केली असून, ट्विटरने आदेशांचे पालन न केल्यास ट्विटरच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली जाईल, असा इशारा दिला आहे.

 

News English Summary: The central government had demanded censorship of accounts transmitting provocative information on Twitter. But Twitter seems to be turning a blind eye to it. The government has tightened its grip on the issue, warning that some senior Twitter officials will be arrested if they do not comply with the order.

News English Title: Modi govt warning that some senior Twitter officials will be arrested if they do not comply with the order news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#twitter(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या