28 January 2025 7:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

लसीकरण | जे भाकीत करण्यात आलं होतं तेच घडलं? मोदींनी सगळा दोष चलाखीने राज्यांवर ढकलला

PM Narendra Modi

नवी दिल्ली, ०७ जून | देशात कोरोना रुग्ण संख्या काही अंशी कमी होताना दिसत आहे. तसेच, लसीकरण जोरदार सुरु आहे. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (७ जून) जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं की कोरोनाची दुसरी लोट अजून गेली नाही. मात्र, कोरोनाशी सामना करण्यासाठी देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या. तसेच अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना लसीकरणावरुन मोदींनी विरोधकांना आणि या आधीच्या कॉंग्रेस सरकारला नाव न घेता टोला लगावला आहे.

“जगात लसीची मागणी होत आहे. जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं”.

“लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “देश संपूर्ण लसीकरणाच्या दिशेन निघालो होतो, पण करोना महामारीने आपल्याला ग्रासलं. भारतच नाही, तर जगासमोर शंका उपस्थित झाली की, भारत इतक्या मोठ्या लोकसंख्येला कसं वाचवणार. पण, निश्चय असेल तर मार्ग निघतोच. भारताने एका वर्षात दोन स्वदेशी लशी तयार केल्या. भारत लसीकरणात मागे नाही,” असंही मोदी म्हणाले.

विशेष म्हणजे मोदींनी केंद्र आणि राज्यांमधील संवादाचा मुद्दा बोलून दाखवताना सर्व जवाबदारी राज्यांवर ढकलल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे याच विषयावर अनेक पत्रकारांनी मत व्यक्त केलं आहे.

  1. पंतप्रधान नरेंद्री मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे
  2. भारतात नेझल लसींच्या निर्मितीवर भर
  3. परदेशातून लस भारतात आणण्यावर भर
  4. कोरोना लसींचा पुरवठा वाढणार
  5. देशात कोविड योद्ध्यांचं लसीकरण पुर्ण
  6. परदेशी कंपन्यांसोबत करार केले
  7. जुन्या सरकारांच्या काळातील पद्धतीनं काम केलं असतं तर देशात लसीकरणासाठी ४० वर्षे लागतील. २०१४ नंतर लसीकरणाचा वेग वाढवला
  8. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान
  9. देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
  10. कोरोना काळात सर्वाधिक औषधं निर्मिती केली
  11. कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवचं
  12. एका वर्षात भारतात २ लसींची निर्मिती
  13. देशात २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पुर्ण
  14. जगात भारत लसीकरणात मागे नाही
  15. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचं पालन करा
  16. ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत घेतली- मिशन कोविड सुरक्षेअंतर्गत लस निर्मिती

 

News English Summary: When Modi raised the issue of dialogue between the Center and the states, it was seen that all the responsibility was shifted to the states. What is special is that many journalists have expressed their views on this issue

News English Title: Modi LIVE indirectly took responsible for state on vaccination failure news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x