22 November 2024 3:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

राम मंदिर भूमिपूजन: हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ - सरसंघचालक

RSS, Mohan Bhagwat, Ayodhya, Ram Mandir

अयोध्या, ५ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरूवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं अयोध्येत स्वागत केलं.

पीएम मोदींनी भगवान श्रीरामलला विराजमान केले. पंतप्रधान मोदी दुपारी १२.४० वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी केला. अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रम सुरु झाला आहे. राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात चांदीचे फावडे आणि चांदीची कणी वापरण्यात आली आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोहन भागवत यांनी संबोधित केलं. सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यापासून मंदिराच्या कामाला सुरूवात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंदिराची पायाभरणी झाली असून, लवकरच कामालाही सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले, “आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प घेतला गेला होता. देवरसजींनी सांगितलं होतं की, २०-३० वर्ष काम करावं लागेल. तेव्हा हे पूर्ण होईल. प्रयत्न केले. अनेकांनी बलिदान दिलं. पदयात्रा करणारे आडवाणीही आज घरातून हा कार्यक्रम बघत असतील. अनेकजण उपस्थित राहू शकले असते, पण परिस्थिती तशी नाहीये. जगाचं कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हस्ते होतेय. याचाही आनंद आहे,” असं भागवत म्हणाले.

 

News English Summary: Bhumi Pujan of Ram Mandir to be constructed in Ayodhya was held by Prime Minister Narendra Modi today. Mohan Bhagwat, Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh was present on the occasion. After the program, Mohan Bhagwat addressed the gathering.

News English Title: Mohan Bhagwat address to people in Ayodhya News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x