3 December 2024 10:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

गोवा | ऑक्सिजन अभावी अजून 15 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

पणजी, १४ मे | गोव्यातील रुग्णालयात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे दोन दिवसापूर्वीच ऑक्सिजनअभावी 26 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी 15 रुग्णांनी ऑक्सिजनअभावी जीव गमावला आहे. गोवा सरकारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, जोपर्यंत गोवा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात जोपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दरम्यान, करोना दुसऱ्या लाटेत गोव्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी करोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

News English Summary: Fifteen corona patients have died at a hospital in Goa. The cause of death is said to be due to low oxygen pressure. Shockingly, two days ago, 26 patients died due to lack of oxygen. Since then, 15 more patients have died due to lack of oxygen.

News English Title: More Fifteen corona patients have died at a hospital in Goa due to oxygen shortage news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x