कृषी विधेयक | शिरोमणी अकाली दल आक्रमक | कायद्यांविरोधात राष्ट्रीय आघाडी स्थापणार
नवी दिल्ली, २९ सप्टेंबर : केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, आता शेतकर्यांनी कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर एक ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेलरोकोची हाक दिली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष राहिलेल्या आणि नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांविरोधात एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने या कायद्यांविरोधात आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी अकाली दलाने केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध प्रादेशिक पक्षांसोबत राष्ट्रीय आघाडी करण्याची घोषणा केली.
अकाली दलाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार प्रा. प्रेमसिंग चंदूमाजरा म्हणाले, “नुकतेच मंजूर झालेले तीन कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर सुरु असलेलं आंदोलन टिकून रहावं यासाठी शिरोमणी अकाली दल प्रादेशिक पक्षांची राष्ट्रीय आघाडी तयार करणार आहे. राष्ट्रीय आघाडीसाठी देशभरातील पक्षांना आमंत्रित करण्यात येणार असून याद्वारे मोठी चळवळ उभी राहिल.” पंजाबमध्ये सोमवारी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त ते एका कार्यक्रमात बोलत होते.
तसेच शेतकरीविरोधी कायद्यांमध्ये आधारभूत किंमतीचा उल्लेख का केला नाही, असा सवाल करीत ट्रॅक्टर पेटवल्याने जनतेला या कायद्यांविरुद्धचा शेतकऱ्यांचा रोष दिसला आहे, अशा शब्दांत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी समर्थन केले.
News English Summary: The Shiromani Akali Dal (SAD), which remained a constituent party of the National Democratic Alliance (NDA) and withdrew from the NDA against the recently passed agricultural laws, has now taken a more aggressive stance against these laws. On Monday, the Akali Dal announced a national alliance with various regional parties on the issue of farmers across the country against the central government.
News English Title: Movements To Establish A National Front Against New Agricultural Laws Akali Dal Initiative Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना