सॅटेलाईट फोटो, लडाखची लोकं, आर्मीचे माजी जनरलही सांगतात चीनने आपला भूभाग बळकावला

नवी दिल्ली 24 जून: भारत आणि चीन दरम्यानच्या सीमावादावर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी अजुन सुरूच आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा खोटेपणचा गंभीर आरोप केल आहे. चीनने भारताची एक इंचह जमीन घेतलेली नाही असं पंतप्रधान म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, लष्करचे माजी अधिकारी, सॅटेलाईटवरून घेतलेले फोटो, पत्रकार, असे सगळेच लोक चीनने एक नाही तर तीन ठिकाणी जमीन घेतली असं सांगत आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे.
राहुल गांधी पुढे म्हणाले, चीनने जमीन घेतली असेल तर पंतप्रधानांनी जनतेला खरं सांगाव, त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. सगळा देश सरकारसोबत आहे असंही ते म्हणाले. त्याचबरोबर सीमेवर असणाऱ्या सैनिकांना शस्त्र का दिली नाहीत याचं उत्तरही सरकारने दिलं पहिजेत अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, लडाखच्या सीमेवर चीन छुप्या पद्धतीनं नवीन चाल खेळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही देशांमधील वाढत जाणारा तणाव कमी कऱण्यासाठी वारंवार बैठका होत असतानाच आता चीननं मंसूबे आखण्याची तयारीत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये #SpeakUpForOurJawans हा हॅशटॅग वापरुन शहीद जवांनांसाठी मोदींनी बोललं पाहिजे असं सांगण्यात आलं आहे. “भारताच्या वीर शहीदांना माझे अभिवादन. संपूर्ण देश एकत्र येऊन, एकात्मतेने आपल्या भारतीय सेनेबरोबर आणि सरकारबरोबर उभा आहे. मात्र यामध्ये एक खूप महत्वाचा प्रश्न समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की भारताची एक इंच जमीनीही कोणी घेतलेली नाही. कोणीही भारताच्या हद्दीत आलं नाही. मात्र लोकं बोलतायत त्याप्रमाणे, उपग्रहांनी काढलेल्या फोटोंमध्ये दिसतयं, लडाखमधील जनता सांगतेय इतकचं काय लष्कारातील निवृत्त जनरलही सांगत आहेत की चीनने आपला भूभाग ताब्यात घेतला आहे. एका जागी नाही तर तीन जागी चीनने आपला भूभाग बळकावला आहे. पंतप्रधनजी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. पण देशाला खरं सांगावं लागेल. तुम्हा खरं बोलावं लागेल. जर तुम्ही म्हणालात की जमीन घेतली नाही आणि जमीन घेतली असेल तर चीनचा फायदा होईल. आपल्याला यांच्याविरोधात एकत्र लढायचं आहे. त्यांना बाहेर हकलवून लावायचं आहे. त्यामुळे न घाबरता तुम्ही बोलावं. जमीन घेतली असेल तर सांगा की हो चीनने जमीन घेतली आहे आणि आम्ही कारवाई करणार आहोत. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे,” असं राहुल यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधींनी, “शेवटचा प्रश्न असा आहे की आपले हे जे शहीद सैनिक आहेत त्यांना हत्यारांशिवाय काय पाठवण्यात आलं आणि कोणी पाठवलं?,” असा प्रश्नही सरकारला विचारला आहे.
प्रधानमंत्री जी,
देश आपसे सच सुनना चाहता है।#SpeakUpForOurJawans pic.twitter.com/tY9dvsqp4N
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 26, 2020
News English Summary: As local peoples of Ladakh say, satellite images show that people in Ladakh are saying that even retired army generals are saying that China has taken over its territory.
News English Title: MP Rahul Gandhi Says Pm Modi Should Accept If China Had Taken Indian Land We Will Fight Together News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB