24 December 2024 11:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य नाही, तो जमिनीतून आपल्या शरिरात जातो - डॉ. तात्याराव लहाने

Mucormycosis

मुंबई, २२ मे | देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळं या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये होणार आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना कराव्या लागणार आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्समधील डॉ. तात्याराव लहाने यांनी या आजाराबाबत महत्वाची माहिती दिली आहे. म्युकरमायोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. यापूर्वीही म्युकरमायकोसिस हा आजार होता असं डॉ. लहाने यांनी सांगितलं.

म्युकर जमिनीतून आपल्या शरिरात जातो. पण तो हवेतून पसरतो असं म्हणता येणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना म्युकरमायकोसिसची लागण होते. म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नसल्याचं डॉ. लहाने यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राज्यात साथीच्या आजारात याचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या सध्या 800 केसेस आहेत. 110 ठिकाणी म्युकरच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात या आजारावरील औषधे सध्या कमी आहे. आधी याची गरज नसल्याने कंपन्यांनी त्याचं उत्पादन केलं नव्हतं. मात्र, आता राज्य सरकारनं म्युकरमायकोसिसवरील औषधांवर नियंत्रण ठेवलं आहे. राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या औषधांचं वितरण होत असल्याची माहितीही डॉ. लहाने यांनी दिलीय.

 

News English Summary: Doctor from Maharashtra Corona Task Force Tatyarao Lahane has given important information about this disease. Mucarmosis is not a contagious disease. Even before this, he had been diagnosed with myocardial infarction said Dr Tatyarao Lahane said.

News English Title:  Mucormycosis is not contagious Dr Tatyarao Lahane news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x