22 January 2025 10:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

प. बंगाल | पंतप्रधान मोदींच्या त्या कॉलनंतरही मुकुल रॉय तृणमूलमध्ये परतले

Mukul Ron in TMC

कोलकाता, ११ जून | भारतीय जनता पक्षात नाराज असलेले राष्ट्रीय अध्यक्ष मुकुल रॉय यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला मुलगा आमदार शुभ्रांशू रॉय आणि समर्थकांसह त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. या दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क पुन्हा वाढवला. भाजपच्या कित्येक बैठकांमध्ये गैरहजर असताना त्यांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते.

भारतीय जनता पक्षावर नाराज असताना त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संवाद साधला होता. दोघांमध्ये झालेल्या 10 मिनिटांच्या संभाषणात मोदींनी रॉय यांच्या पत्नीच्या आजारपणाची विचारणा सुद्धा केली. पण, मोदींशी चर्चा झाल्याच्या ठीक 7 दिवसांनंतर मुकुल रॉय यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाणार असल्याचा निर्णय घेतला.

मोदींच्या कॉलनंतरही निर्णय बदलला नाही:
मुकूल रॉय यांच्या पत्नी आजारी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबद्दल मुकूल रॉय यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केला होता. मात्र त्यानंतरही रॉय यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुभ्रांशू रॉय यांनी देखील तृणमूलमध्ये घरवापसी केली आहे.

हे आहे भाजप सोडण्याचे कारण:
तृणमूल काँग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की जो मान सन्मान मिळण्याच्या अपेक्षेने मुकुल रॉय भाजपमध्ये गेले होते, तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळेच ते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येत आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, शुभेंदूंना जसा मान-सन्मान भारतीय जनता पक्षामध्ये मिळाला. तसे मुकुल रॉय यांना मिळालेले नाही. एकेकाळी भाजपमध्ये नंबर 2 चे नेते राहिलेले मुकुल रॉय यामुळेच चिंतीत होते.

हे नेते सुद्धा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी आतुर:
भारतीय जनता पक्षात गेलेले आणि तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये मुकुल रॉय एकटे नाहीत. त्यांच्यासमवेत भाजपचे आणखी 33 खासदार पुन्हा तृणणूल काँग्रेसमध्ये सामिल होण्यासाठी आतुर आहेत. या नेत्यांमध्ये राजीव बॅनर्जी, सोवन चॅटर्जी, सरला मुर्मू, माजी आमदार सोनाली गुहा आणि दीपेंदू विश्वास यांचा समावेश आहे. पण, ममता बॅनर्जी त्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेण्यास तयार नाहीत. त्यांना पक्षात घेतल्यास प्रामाणिक सदस्यांमध्ये असंतोष वाढेल असे ममतांना वाटते. एकदा पक्षाशी दगा केला त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये असे तृणमूल काँग्रेसच्या एका गटाचे मत आहे.

 

News Summary: Outraged Bharatiya Janata Party (BJP) national president Mukul Roy has finally decided to join the Trinamool Congress. He decided to return home with his son MLA Shubhranshu Roy and supporters. He had been angry with the BJP for the last several days. Meanwhile, he re-established contacts with West Bengal Chief Minister Mamata Banerjee. While absent from several BJP meetings, he had given reasons for his wife’s illness.

News Title: Mukul Roy has finally joined the Trinamool Congress even after call of PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x