18 November 2024 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर भाजप आ. भातखळकरांचं संतापजनक ट्विट, हा उत्तर भारतीय आणि यादवांचाही अपमान, नेटिझन्स संतप्त

MLA Atul Bhatkhalkar

Mulayam Singh Yadav | समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकसभेचे खासदार मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांना दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि २ ऑक्टोबरपासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ते लाइफ सपोर्ट सिस्टिमवर होते. सध्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशातील सैफई येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुलायम सिंह यांची प्रकृती 2 ऑक्टोबरपासून चिंताजनक होती. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. रिपोर्टनुसार, त्यांची किडनीही नॉर्मल काम करत नव्हती. मुलायमसिंह हे बराच काळ आरोग्याच्या समस्येतून जात होते आणि या आधीही त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

अखिलेश यादव यांनी माहिती दिली :
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव स्वत: मेदांता रुग्णालयात उपस्थित होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही त्यांनी ही माहिती दिली आहे. अखिलेश यांच्याआधी शिवपाल यादव आणि रामगोपाल यादव दिल्लीत उपस्थित होते. अखिलेश यांच्यासोबत त्यांची पत्नी डिंपल आणि मुलंही गुरुग्राममध्ये पोहोचली आहेत.

पंतप्रधान मोदी यांचं ट्विट :
मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख . देशातील आणीबाणीच्या काळात मुलायमसिंह यादव यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी सच्चा सैनिक म्हणून काम केले, असे ते म्हणाले.

भाजप आमदारच संतापजनक ट्विट :
भारताच्या राजकीय प्रवासातील एक मोठा नेता आज देवाघरी गेला आणि त्यावरून ट्विट करताना सुद्धा धार्मिक द्वेष आणि खोचक टिपणी करून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळतंय. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या वृत्तावर ट्विट करताना म्हटले की, “कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो”.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mulayam Singh Yadav passes away BJP MLA Atul Bhatkhalkar made controversial tweet check details 10 October 2022.

हॅशटॅग्स

#BJP MLA Atul Bhatkhalkar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x