फक्त शेतकरी विरोधातल्या बातम्या दाखवून गोदी मीडिया सत्य का लपवत आहे..? - भाई जगताप
मुंबई, २७ जानेवारी: मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील दीप सिद्धू हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, त्याचे पंतप्रधानांबरोबर फोटो असल्याचेही म्हटले आहे.
दरम्यान, काल पासून शेतकरी विरोधी वृत्त मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. एकूण शेतकऱ्यांची प्रतिमा मालिन करण्याचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप समाज माध्यमांवरून देखील सात्यत्याने केला जातं आहे. त्याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करताना म्हटलं आहे की, “फक्त आणि फक्त शेतकरी विरोधातल्या बातम्या दाखवून गोदी मीडिया सत्य का लपवत आहे..???
फक्त आणि फक्त शेतकरी विरोधातल्या बातम्या दाखवून गोदी मीडिया सत्य का लपवत आहे..???
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) January 27, 2021
News English Summary: Anti-farmer news has been spreading on a large scale since yesterday. It is also being accused on social media that it is a big conspiracy to tarnish the image of the farmers. Following the same topic, Mumbai Congress President Bhai Jagtap tweeted, “Why is the dock media hiding the truth by showing only anti-farmer news ..?
News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap criticised media over stand against farmers news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल