प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस
मुंबई, १६ एप्रिल: देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
भारतात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 15 लाखांच्या पार झाली आहे. आता येथे 15 लाख 63 हजार 588 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित शहरांच्या यादीमध्ये भारताच्या 15 शहरांचा समावेश आहे. यावरुन आपण देशातील कोरोनाच्या कहराचा अंदाज लावू शकतो. या यादीमध्ये पुणे टॉपवर आहे तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशी परिस्थिती आहे की, देशात जवळपास 120 जिल्ह्यांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटरसारख्या सुविधांचा तुटवडा आहे.
एकाबाजूला देशात अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे स्मशानभूमीत देखील वेटिंग असल्याने इतर खाली जागांवर प्रेतं जाळली जातं आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मोदी आणि अमित शहा यांच्या निवडणूक रॅली सुरु आहेत. कोरोना आपत्तीत देशाला गरज असताना देखील मोदी – शहा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचं दिसतंय. त्यालाच अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “इतिहास गवाही देगा..”लाशें जल रही थी, साहब चुनाव प्रचार में जुमलेबाजी कर रहे थे”…सत्य कितना छुपाओगे मोदीजी??
इतिहास गवाही देगा..
“लाशें जल रही थी, साहब चुनाव प्रचार में जुमलेबाजी कर रहे थे”
सत्य कितना छुपाओगे मोदीजी??#गुजरात_मॉडल
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) April 16, 2021
News English Summary: History will testify .. “The corpses were burning, saheb was indulging in campaigning” … How much truth will Modi hide ?? said Mumbai congress president MLA Bhai Jagtap news updates.
News English Title: Mumbai congress president Bhai Jagtap slams PM narendra Modi over election campaign in corona Pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO