22 January 2025 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

प. बंगालने पहिला डोस दिला आहे, उत्तर प्रदेशात दूसरा डोस | २०२४ पर्यन्त महामारी समाप्त - आ. भाई जगताप

MLA Bhai Jagtap

मुंबई, २५ मे | नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवणुकीत भाजपाला तीन मोठ्या राज्यात मोठा राजकीय फटका बसला आहे. त्यात पश्चिम बंगालमधील सर्व स्वप्नं भंगल्याने भाजपमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कोरोना आपत्तीमुळे देशात चिंतेचं वातावरण असलं तरी देखील उत्तर प्रदेशात अत्यंत भीषण परिस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना आपत्तीमुळे उत्तर प्रदेशात हाहाकार मजल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि कोरोना आपत्ती २०२२ पर्यंत लांबणार असेच संकेत मिळत आहेत. परिणामी भाजप आणि आरएसएस’मध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं वृत्त आहे. कारण उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये पराभव झाल्यास २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत देखील मोदी सरकार जाणार हे जवळपास निश्चित होणार आहे.

याच पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आरएसएस’च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत बैठक झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत आरोग्य व्यवस्था आणि गंगा नदी तसेच गंगा घाटावरील कोरोना मृतांचे शव देशातील चर्चचा विषय ठरला आहे. परिणामी स्वतः मोदींचा देखील २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतो किंवा मोदींचा मतदारसंघ बदलला जाऊ शकतो. अन्यथा मोदींना दोन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता आधीच राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशात २०२२ यामध्ये मतदारांकडून मतं मागायची तरी कोणत्या विषयावरून हाच भाजपच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात यूपीतील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाने घेतलेल्या आघाडीने भाजपमध्ये चिंता वाढली आहे.

देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. मात्र तत्पूर्वी पश्चिम बंगाल आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात सत्ता गेल्यास २०२४ मध्ये मोदी पायउतार होणार असेच संकेत मिळतील. याच विषयाला अनुसरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाऊ जगताप यांनी भाजपाला टोला लागवताना म्हटलंय की, “प.बंगालने पहिला डोस दिला आहे, यूपीला दूसरा डोस, २०२४ पर्यन्त महामारी समाप्त”.

 

News English Summary: The country is going to hold Lok Sabha elections in 2024. But before that, if West Bengal and then Uttar Pradesh come to power, there will be indications that Modi will step down in 2024. Following the same subject, Mumbai Congress President A. Bhau Jagtap, while lashing out at the BJP, said, “West Bengal has given the first dose, Uttar Pradesh will give second dose, the epidemic will end by 2024.”

News English Title: Mumbai Congress president MLA Bhai Jagtap slams BJP over 2024 loksabha election news updates.

हॅशटॅग्स

#BhaiJagtap(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x