19 April 2025 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची यूपीत निर्घृण हत्या | आरोपी डॉक्टर ताब्यात

Murder, Young lady doctor, Yogita Gautam, One sided love

लखनऊ, २० ऑगस्ट : एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही बातमी पसरली तेव्हा एसएन मेडिकल कॉलेजचे सहकारी डॉक्टरही अवाक झाले. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर योगिता गौतमची डोके चिरडून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह सापडल्य़ाचे तिच्या वडिलांना कळविले. यानंतर वडील आणि भाऊ आग्र्याला पोहोचले. त्यांनी आग्रा एमएम गेट पोलीस चौकीमध्ये मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला. तिच्या वडिलांनी आरोप केला की, उरई मेडिकल कॉलेजचा मेडिकल ऑफिसर डॉ. विवेक तिवारी योगिताला प्रेमसंबंधांसाठी त्रास देत होता. तो योगिताला ठार मारण्याची धमकी देत होता. यानंतर पोलिसांनी योगिताचा मृतदेह सापडला त्या भागीतील सीसीटीव्ही फुटेज शोधले. यामुळे पोलिसांच्या हाती विवेकविरोधात पुरावे सापडले आहेत.

पोलिसांनी सायंकाळी विवेक तिवारीला ताब्यात घेतले असून पोस्टमार्टेम अहवालात योगिताच्या डोके आणि गळ्यावर जखमा आहेत. तसेच ती प्राण वाचविण्यासाठी झगडल्याचे म्हटले आहे. योगिताच्या सहकारी डॉक्टरांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यामुळे काही काळ एसएन मेडिकल कॉलेजमधील रुग्णसेवाही प्रभावित झाली होती.

 

News English Summary: Uttar Pradesh is shaken by the murder of a young doctor studying MD. Doctor Yogita Gautam, MD of Sarojini Naidu Medical College in Agra, has been brutally murdered.

News English Title: Murder of young lady doctor Yogita Gautam in one sided love at Agra Delhi News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या