चौकशीच्या महत्वाच्या टप्प्यात NCB प्रमुख मुंबईत आढावा बैठक घेऊन पुन्हा दिल्लीला?
मुंबई, २८ सप्टेंबर : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. या प्रकरणाचा संबंध ड्रग्स कनेक्शनशी असल्याच स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू होती आणि ही चौकशी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना करत होते. पण आता अशी माहिती मिळाली की राकेश अस्थाना पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत. अस्थाना रवाना झाले असले तरीही कुणालाही क्लीन चिट मिळालेली नाही.
राकेश अस्थाना जाताना अधिकाऱ्यांना काही सूचना देऊन गेल्याचं कळत आहे. ज्यात तपासाची दिशा काय असेल याचे निर्देश दिले ,कोणालाही क्लीन चिट दिली नाही, तपास सुरू आहे. पण तपास सुरू असताना राकेश अस्थाना दिल्लीला गेल्यामुळे सगळ्यांच लक्ष तिकडेच केंद्रीत झालं आहे.
बॉलिवूड (Bollywood) ही भारताची (India) एक ओळख आहे. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या व्यवसायाने अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. या दिग्गजांची क्रिकेट, कबड्डीसह वेगवेगळ्या खेळांच्या लीगमध्ये मोठी गुंतवणूक आहे. भारतात असंख्य तरुण तरुणी बॉलिवूड कलाकारांना आपले आदर्श मानतात. अशा परिस्थितीत सुशांतच्या आत्महत्येचा तपास सुरू असताना मिळालेले धागेदोरे ड्रग प्रकरणाकडे घेऊन गेले आहेत.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग प्रकरणात रिया चक्रवर्तीसह (Rhea chakraborty) बारापेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. यात काही बॉलिवूड अभिनेत्री आणि टॅलेंट मॅनेजर यांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी आणखी विस्तारण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ड्रग प्रकरणात तर्कवितर्कांना उधाण आले असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख राकेश अस्थाना दिल्लीहून मुंबईत आले.
News English Summary: As the drug probe into Bollywood intensifies, Narcotics Control Bureau (NCB) chief Rakesh Asthana along with 3-4 officers has travelled from Delhi to Mumbai to review the case, report sources on Sunday. The NCB chief accompanied by Joint Director Sameer Wankhede has spoken with the NCB Mumbai team and is said to be analyzing the evidence gathered till date in the case. Asthana, who took charge in August, was previously the CBI special director and was one of the parties in the late 2018 ‘CBI vs CBI’ case when his senior- then-CBI director Alok Verma and he registered cases against each other. He also serves as the DG of the Border Security Force (BSF).
News English Title: NCB chief Rakesh Asthana left Mumbai reviewed the progress of the case Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट