15 November 2024 4:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

बेळगाव पोटनिवडणुक | शुभम शेळकेच्या प्रचारासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी देखील मैदानात

NCP Leader Rupali Chakankar

बेळगाव, १५ एप्रिल: बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.

मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीची एकीकडे तयारी सुरु असताना दुसरीकडे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर या मतदार संघात पोटनिवडणूक आहे. १७ एप्रिलला ही निवडणूक होणार आहे.

याच निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना खासदार संजय राऊत सध्या बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी ते बेळगावात गेले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही बेळगावात पोहोचल्या आहेत.पंढरपूर येथे भगीरथ भालके यांचा प्रचार केल्यानंतर बेळगावात शिवसेनेच्या साथीला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता बेळगावातही सेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पाठिंब्याने शुभम शेळके विजयी होणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

News English Summary: NCP’s women state president Rupali Chakankar has also reached Belgaum. After campaigning for Bhagirath Bhalke at Pandharpur, NCP’s Rupali Chakankar has reached Belgaum with Shiv Sena. Therefore, it will be important to see whether Shubham Shelke will win in Belgaum with the support of Sena and NCP leaders.

News English Title: NCP Leader Rupali Chakankar in Belgaum to support Shubham Shelke news updates.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x