27 January 2025 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

सहकारी बँका वाचवा | शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Sharad Pawar, Writes Letter, PM Narendra Modi, Co Operative Bank Privatization, Reserve Bank

मुंबई, १९ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. शंभर वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेल्या सहकारी बँकांबाबत पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधानांना पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला, असे पवार पत्राच्या सुरुवातीला म्हणतात. “केंद्र सरकारने मध्यमवर्गीयाचे हित जपण्यासाठी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्ही म्हणालात. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो” असे पवारांनी लिहिले आहे.

“सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलणं हे समस्येचं निराकरण नाही,” असंही ते म्हणाले. सहकारी बँकांना आर्थिक शिस्त लागावी याच्याशी आपण सहमत आहोत. परंतु सहकारी बँकांना खासगी बँकांमध्ये बदलून पैशांचा गैरव्यवहार त्वरित थांबेल असं म्हणणं चुकीचं ठरेल. २०१९-२० या आर्थिक वर्षात सहकारी बँकांमध्ये गैरव्यवहार कमी झाले असल्याचा दावा शरद पवार यांनी रिझर्व्ह बँकेची आकडेवारी दाखवत केला आहे. १०० वर्षे जुन्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचं योगदान देणाऱ्या सहकारी बँकांवर विनाकारण निर्बंध न घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

News English Summary: NCP president MP Sharad Pawar has written a letter to Prime Minister Narendra Modi requesting him to save the co-operative banks. He said that Prime Minister Narendra Modi would also agree with the statement that co-operative banks are the backbone of the rural economy.

News English Title: NCP Leader Supremo Sharad Pawar Writes Letter Pm Narendra Modi Co Operative Bank Privatization Reserve Bank News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x