15 November 2024 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

गुजरात दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं - राष्ट्रवादी

NCP minister Nawab Malik, PM Narendra Modi, Gujarat riots

मुंबई, ०३ मार्च: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. “काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली.

“मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, विधानभवन परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मलिक म्हणाले,”आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, हे राहुल गांधी यांनी ४५ वर्षांनंतर स्वीकारलं. काँग्रेसनं कुठे न कुठे आपली चूक मान्य केली आहे. दिल्लीतील दंगलीबद्दल माफी मागितली. आता भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ आहे. गुजरातमधील दंगल कुठे न कुठे चुकीची होती, हे त्यांनी मान्य करावं. भारतीय जनता पक्षाला आम्ही पुन्हा एकदा विचारतोय… जर काँग्रेस आपल्या चुका सुधारत असेल, तर ते कधी चुका सुधारणार हे लोकांना सांगावं,” असा सवाल नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला केला आहे.

 

News English Summary: NCP spokesperson Nawab Malik spoke to the media at the Vidhan Bhavan premises. This time, Malik said, “Rahul Gandhi admitted after 45 years that the decision to call an emergency was wrong. The Congress has admitted its mistake somewhere. He apologized for the riots in Delhi. Now is the time for the Bharatiya Janata Party and Prime Minister Narendra Modi. He should admit that the riots in Gujarat were wrong somewhere. We are once again asking the Bharatiya Janata Party, “If the Congress is correcting its mistakes, then tell the people when it will correct its mistakes,” Nawab Malik has asked Prime Minister Narendra Modi and the Bharatiya Janata Party.

News English Title: NCP minister Nawab Malik questioned PM Narendra Modi over Gujarat riots news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x