22 November 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दलचं मोदींच ते जुनं ट्विट | आ. रोहित पवारांकडून आठवण

NCP MLA Rohit Pawar, PM Narendra Modi, old twit, Farmers rights

मुंबई, 08 डिसेंबर : युपीए सरकारच्या काळात केंद्रीय कृषीमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी लिहिलेलं हे पत्र वायरल होत आहे. त्यावर आता स्वत: शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पत्राबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नाही”.

सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र पुन्हा एकदा व्हायरल झालं असून भाजप पाठिंबा देण्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधत आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर टीका केली होती. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे.

शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी मोदींच्या शेतकऱ्यांसंबंधित जुन्या ट्विटची आठवण करून देत भारतीय जनता पक्षाला तोंडघडी पाडलं आहे. शेतकऱ्यांना हमी भावासंबंधी मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जी भूमिका मांडली होती, त्याकडे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधत पवारांवरील टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

यासंदर्भात आ. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘शरद पवार यांच्या पत्राचा संदर्भ देताना पत्राचा पहिला परिच्छेद वाचला जात आहे, परंतु पत्राचा पुढील भाग मात्र टाळला जात आहे. पत्र पूर्ण वाचले असते तर कदाचित ते पत्र कुठल्या कायद्याच्या संदर्भात लिहिले गेले आहे ते देखील कळले असते, आणि २००७ च्या मसुद्याचा नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित शेतकरी आंदोलन का करीत आहे? आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? हे देखील समजले असते. केलेले कायदे बरोबरच आहेत, चुकीचे नाहीत, मागे घेण्याचा प्रश्नच नाही हा केंद्र सरकारनं आपला इगो बाजूला ठेवायला हवा आणि विरोध कशासाठी हे समजून त्यावर उपाय काढायला हवा.’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘२०११ मध्ये पंतप्रधान मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ग्राहक संरक्षण कार्यगटाचे (Working Group on Consumer Affairs)चे अध्यक्ष होते. या कार्यगटाने २० शिफारशी केल्या होत्या आणि ६४ सूत्री कार्यक्रम सांगितला होता. त्यात अनेक ठिकाणी हमीभावाचा उल्लेख केला आहे. तेव्हा मोदी यांनीही ‘शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भाव मिळता कामा नये, यासाठी कायदेशीर तरतुदीद्वारे संरक्षण दिले पाहिजे.’ अशी शिफारस केली होती. आणि आता तीच मागणी शेतकरी करत आहेत.

मोदी यांनी २०१४ मध्ये ६ एप्रिल रोजी ट्वीट केले होते, त्यात ते म्हणतात ‘Why should our farmers not get the right price? Farmers are not begging, they worked hard for it & should get good prices’ २०११ मध्ये मोदीजींच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या भूमिकेनुसारच, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. त्यांना सर्रास कोणाचाही विरोध नाही. आज शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत, सर्व स्तरातून शेतकऱ्याला पाठींबा मिळत आहे, तरी देखील केंद्र सरकार प्रतिसाद न देता अडून बसले आहे, याला काय म्हणावे. आज शेतकरी कष्ट करत नाही का? आज शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला नको का? आपण ज्या मागण्या केल्या होत्या किंवा ज्या शिफारशी केल्या होत्या, त्याच मागण्या आज शेतकरी करत आहेत. तर मग केंद्र सरकारची अडचण काय ते केंद्र सरकारने स्पष्ट करावे,’ अशा सवालही रोहित पवार यांनी केला आहे.

 

News English Summary: Replying to the criticism on Sharad Pawar, MLA Rohit Pawar has slammed the Bharatiya Janata Party, recalling Modi’s old tweet about farmers. MLA Rohit Pawar has tried to respond to the criticism leveled by Modi by pointing out the role played by Modi when he was the Chief Minister of Gujarat. PM Modi was said that time in twit, ‘Why should our farmers not get the right price? Farmers are not begging, they worked hard for it & should get good prices.’

News English Title: NCP MLA Rohit Pawar gave reminder about PM Narendra Modi old twit regarding farmers rights news updates.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x