आमच्या राज्याबद्दल कोणीही काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का | प्रफुल पटेल यांचा संताप
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये संपूर्ण देशातून लोक येऊन वास्तव्य करत असतात. लोकांना तिथे आपलं घर निर्माण करुन वास्तव्य करण्याची संधी देऊन चूक केलीये का ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेत केली आहे. राज्यातील करोना स्थितीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे कंगनाच्या वक्तव्यावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का ? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी विचारला.
“महाराष्ट्राबद्दल बोलायचं गेल्यास मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये करोनाची गंभीर परिस्थिती आहे. संपूर्ण देशातील लोकांना तिथे घर निर्माण करण्याची संधी देऊन या शहरांनी चूक केली आहे का? त्यांच्यावर टीका होणार का ? आमच्या राज्याला कोणीही येऊन काहीही बोलल्यावर आम्ही सहन करावं का?,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
“करोनाविरोधील लढाईची सुरुवात केंद्राच्या आदेशाचं पालन करतच सर्व राज्यांनी केली. आता अनलॉक प्रक्रियादेखील केंद्रीय गृहमंत्रालयाकडून येणाऱ्या गाइडलान्सनुसारच होत आहे. जर आपण सर्वजण एकत्र लढत आहोत तर आरोप-प्रत्यारोप करण्याची गरज नाही,” असं मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. भारताने कोरोना रुग्ण संख्येत 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिवसागणिक वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या भारतासाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या 24 तासात देशात 97 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1132 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51 लाख 18 हजार 254 इतकी झाली आहे. त्यापैकी 40 लाख 25 हजार 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
News English Summary: People from all over the country come and live in big cities like Mumbai, Pune, Thane in Maharashtra. Did you make a mistake by giving people a chance to build their own house and live there? This question has been asked by NCP MP Praful Patel in the Rajya Sabha. He indirectly commented on the controversy that started with Kangana’s statement. Should we tolerate anyone coming to our state and saying anything? This time he asked such an angry question.
News English Title: NCP MP Praful Patel indirectly slams Kangana Ranaut over her statement about Mumbai PoK Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS