20 January 2025 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700 IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर
x

कांदा आणि लोकांच्या समस्येवर सुप्रिया सुळेंचा प्रश्न; अर्थमंत्री म्हणाल्या मी फार कांदा-लसूण खात नाही

Union Finance Minister Nirmala Sitharaman, MP Supriya Sule

नवी दिल्ली: कांद्याच्या कांद्याचे दर वाढल्यानं सामान्य लोकांच्या आणि हॉटेल उद्योगांशी संबधीत मोठे आणि छोटे व्यवसाय करणारे सुद्धा रडकुंडीला आले आहेत. घरांचं संपूर्ण बजेटच कोलमडले आहे आणि रोजच्या जेवणात लागणार कांदा टाळायचा तरी कसा या प्रश्नाने सामान्य माणूस चिंतेत आहे. अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.

यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थमंत्री यांना उपदेशून आणि सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून प्रश्न उपस्थित केला. सुप्रिया सुळेंनी प्रश्न जरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला असला तरी त्यांच्या प्रश्नामागील मूळ मुद्दा हा सामान्य माणसाच्या समस्या असा होता. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कांद्याचे भाव गगनाला भिडल्याच्या समस्येवरून प्रश्न उपस्थित केला. त्यावर मी फार कांदा , लसूण खात नाही. माझ्या कुटुंबात देखील कोणी फार कांदा, लसूण खात नाही, असं उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. वास्तविक अर्थमंत्र्यांना प्रश्नांमागील मूळ समस्या कळते का असाच प्रश्न यापूर्वी देखील उपस्थित झाला आहे.

देशभरात कांद्याचे दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाल्याने खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले. तुम्ही कांदा खाता का, असा सवाल सुळेंनी विचारला. त्यावर मी फार लसूण, कांदा खात नाही. आमच्या कुटुंबातही कांदा, लसूण फारसा खाल्ला जात नाही, असं अर्थहीन आणि मूळ विषयाला अनुसरून नसलेलं उत्तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कांद्याच्या वाढत्या दरावरुन सरकारला संसदेत धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले. मला सरकारला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. सरकार इजिप्तहून कांदा मागवत आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं उचलेल्या या पावलाचं मी स्वागत करते. मी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करते आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं. परंतु यंदा कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट का झाली? अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतात. तो शेतकरी संकटात आहे. त्याला वाचवण्याची गरज आहे, असं सुळे म्हणाल्या. (NCP MP Supriya Sule Raised the Question in the Parliament over Increasing Rates of Onions)

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x