23 February 2025 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

दुनिया घुम लो...लस पुण्यातच सापडणार | अन्यथा म्हणायचे मीच लस शोधली - खा. सुप्रिया सुळे

NCP MP Supriya Sule, Corona Vaccine, PM Narendra Modi

पुणे, २८ नोव्हेंबर: देशात झपाट्यानं पसरलेल्या कोरोना संसर्गानंतर आता प्रत्येकाला कोरोना व्हॅक्सिनची प्रतिक्षा लागली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता कोरोना व्हॅक्सिनवर लक्ष केंद्रित केलं आहे. याचसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याचा दौऱ्यावर आहेत.

पीएम मोदी यांनी अहमदाबाद येथे कोविड व्हॅक्सिन सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला आणि ते हैदराबादला पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादेतील जीनोम खोऱ्यातील ‘भारत बायोटेक’ला भेट देऊन त्यांनी स्‍वदेशी कोविड-19 व्हॅक्‍सिनबाबत माहिती जाणून घेतली. येथून आता पंतप्रधान पुण्याकडे रवाना झाले होते.

आता पंतप्रधान पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले आहेत. त्यानंतर सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीरम इन्स्टिट्युटबाबत माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधानांच्या या व्हॅक्सिन टुरिझमवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

 

News English Summary: There is nothing beyond Pune. Despite traveling around the world, the vaccine will eventually be found in Pune. The vaccine has been invented by the people of Pune. Supriya Sule has slammed Prime Minister Narendra Modi for saying that I have found out otherwise. She was speaking at a graduate and teacher constituency review meeting in Maval.

News English Title: NCP MP Supriya Sule talked on Corona Vaccine tourism tour of PM Narendra Modi News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x