21 November 2024 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाजप देशाला 'कमलस्तान' म्हणू लागेल तो दिवसही दूर नाही | ड्रॅगन फ्रूट नामांतरांवरून खिल्ली

NCP party, BJP Party, Gujarat govt, Dragon fruit, Kamalam

मुंबई, १९ जानेवारी: गुजरातमध्ये ड्रॅगन फळाचं नामकरण झालं आहे. आता ड्रॅगन नावाचं फळ ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय.

गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ड्रॅगन’ या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून ‘कमलम’ करण्यात आलाय. ड्रॅगन हे फळ कमळासारखं दिसत. त्यामुळे या फळाला नावं संस्कृत शब्दानुसार कमलम हे देण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटलं आहे. गुजरात राज्य सरकारने ड्रॅगन फ्रूटचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आम्ही चीनशी संबंधित असलेल्या या फळाचं नाव बदललं आहे. कमलम हा एक संस्कृत शब्द आहे आणि या फळाचा आकार देखील कमळासारखाच आहे. त्यामुळे आम्ही कमलम असं नाव ठेवण्याचा निर्णय घेतला” असं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे.

दरम्यान, ड्रॅगन फळाचे नाव ‘कमलम’ असे ठेवण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीने म्हटलं आहे की, ती वेळ देखील दूर नाही जेव्हा भाजप देशाला ‘कमलस्तान’ म्हणू लागेल. पीटीआय’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: NCP party takes dig at BJP over Gujarat govt’s bid to rename dragon fruit as ‘Kamalam’; says time may not be far when the saffron party would start calling the country ‘Kamalastan’.

News English Title: NCP party takes dig at BJP over Gujarat govt’s bid to rename dragon fruit as Kamalam news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x