22 December 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price
x

भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली | नेपाळ आणि श्रीलंका'वर लक्ष ठेवा

Sharad Pawar, India China, Sri Lanka and Nepal, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. भारताने श्रीलंका आणि नेपाळमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. तसेच चीनच्या घुसखोरीवरही नजर असली पाहिजे. भारतीय उपखंडात चीनच्या गुप्त हालचाली सुरु आहेत. हा प्रदेश चीन सर्व बाजूंनी घेरत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातील चिनी नौदलाची उपस्थिती हा चिंतेचा विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी 31 ऑगस्टला चीनी लष्कराने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केले होते. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले, असे भारत सरकारने स्पष्ट केलं होतं.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भारताचे माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण उपस्थित होते.

एअर मार्शल भुषण गोखले यांनी भारताने सायबर, माहिती व तंत्रज्ञान, प्रतिमानिर्मिती आणि आर्थिक अशाप्रकारच्या आधुनिक पद्धतीच्या समांतर युद्ध तंत्रावरही भर देण्याची गरज व्यक्त केली. तर विजय गोखले यांनी भारत-चीन यांच्यातील सीमावादाचा इतिहास आम्हाला समजावून सांगितला. गेल्या काही महिन्यांत भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकींविषयीही त्यांनी मत मांडले, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

 

News English Summary: India should keep a close eye on developments in Sri Lanka and Nepal. China’s intrusion should also be monitored. China’s covert operations are underway in the Indian subcontinent. This region is surrounded by China on all sides. Sharad Pawar said the presence of Chinese navy in the South China Sea was a matter of concern.

News English Title: NCP President Sharad Pawar on India China face off says keep eye on Sri Lanka and Nepal Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x