27 January 2025 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

काँग्रेसजनांमध्ये गांधी परिवाराबाबत आस्था | पण राहुल गांधींमध्ये सातत्याचा थोडा अभाव

NCP President Sharad Pawar, Rahul Gandhi, congress internal crisis

मुंबई, ३ डिसेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीतही (Bihar Assembly Election 2020) मोठी हार पत्करावी लागल्याने काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा (Congress president Selection digitally) निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

तत्पूर्वी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली होती. त्या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे वृत्त होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले होते.

दरम्यान, १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांच्याबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये त्याच्या नेतृत्वाची मान्यता पक्षसंघटनेत आणि लोकांमध्ये किती आहे, हे पाहणं आवश्यक असतं. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकची स्थिती लक्षात घेतली तर अजूनही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसजनांमध्ये (Congressmen still have faith in the Gandhi-Nehru family) आहे. सोनियाजी काय किंवा राहुल गांधी काय हे दोघेही त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत असल्याने पक्षातील बहुसंख्य लोक त्यांच्या विचाराचे आहेत आणि ही वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे.

यावेळी देश राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहे का, अशी विचारणा केली असता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) म्हणाले की, असे आहे की त्यांच्यामध्ये काही प्रश्न आहेत. त्यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे (Rahul Gandhi lacks consistency said Sharad Pawa), असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच बराक ओबामा यांनीही आपल्या पुस्तकात राहुल गांधींबाबत केलेल्या उल्लेखाबाबतही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बराक ओबामा यांनी त्यांची मतं मांडली असतील. पण सगळ्यांची मतं आपण मान्य केली पाहिजेत असं नाही. आपल्या देशातील नेतृत्वाबाबत मी काही बोलेन, पण बाहेरील देशातील नेतृत्वाच्या प्रश्नाबाबत मी फारशी चर्चा करणार नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

News English Summary: December 12 is Sharad Pawar’s birthday. Vijay Darda, Chairman, Lokmat Media, interviewed Sharad Pawar on the occasion. When asked about Rahul Gandhi in this interview, Sharad Pawar said that it is important to see how much recognition his leadership has in any political party in the party organization and among the people. Given the rank and file situation in the Congress today, the Congressmen still have faith in the Gandhi-Nehru family. Since Soniaji or Rahul Gandhi both represent that family, the majority of the people in the party are of their opinion and we have to accept this fact.

News English Title: NCP President Sharad Pawar statement on Rahul Gandhi after congress internal crisis news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x