भारतात पुरवठा तसेच १८ देशांना पंजाब-हरियाणातून गहू-तांदूळ निर्यात होतो | केंद्रानं शहाणं व्हावं
मुंबई, ६ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. समाज माध्यमांवर देखील शेतकरी आंदोलनाविरुद्ध ट्रेंड सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. कॅनडा आणि ब्रिटनमधून मिळालेल्या प्रतिसादानंतर थेट संयुक्त राष्ट्रातून देखील या आंदोलनाचं समर्थन करण्यात आलं आहे. “लोकांना शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असून अधिकाऱ्यांनी त्यांना ते करु द्यावं,” अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि प्रवक्ते अँटोनिओ गुटेरस यांनी भारतातील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे.
संयुक्त राष्ट्रांचे आणखी एक सरचिटणीस स्टिफन डुजारिक यांना शुक्रवारी एका पत्रकारानं भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही लोकांना स्वतःसाठी आवाज उठवताना पाहू इच्छितो. मी आपल्याला हेच सांगेन जे मी दुसऱ्यांशी या मुद्द्यावर बोललो आहे. लोकांना शांततापूर्ण पद्धतीने निषेध आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तसं करु द्यायला हवं.”
याच विषयाला नुसरून प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. “पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी”, असं शरद पवार म्हणाले.
News English Summary: Speaking to the media on the same subject, Sharad Pawar commented on the farmers’ movement. “Farmers in Punjab and Haryana have a huge contribution to make in the country’s agriculture. Wheat and rice grown by farmers in these states are exported not only to the country but also to 17 to 18 other countries. Now we have to play the role of wisdom “, said Sharad Pawar.
News English Title: NCP President Sharad Pawar talked on Delhi Farmers protest against Farm Bills news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News