30 January 2025 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan EMI | 20,000 रुपयांच्या पगारात किती लाखांचे गृहकर्ज मिळेल, EMI कितीचा बसेल, सर्वसामान्य व्यक्तीसाठी बातमी UPI ID | UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट, 1 फेब्रुवारीपासून थेट ब्लॉक होणार अशा प्रकारचे ट्रांजेक्शन, अपडेट जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, मिळेल 70% परतावा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार - NSE: TATAMOTORS HUDCO Share Price | फायदा घ्या, हा सरकारी कंपनीचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स
x

चंद्राबाबू-शरद पवार भेट! दीड तास चर्चा

Loksabha Election 2019, Chandrababu Naidu, NCP, TDP, Sharad Pawar

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या ७व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या मतदान पार पडणार आहे. यादरम्यान नवं सरकार बनविण्याच्या दृष्टीने विरोधकांच्या जोरदार हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी’चे सर्वेसेवा चंदबाबू नायडू यांनी आज राजधानी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंच परंतु त्यानंतर चंद्राबाबूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांची देखील भेट घेतली. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली असून तब्बल दीड तास त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू लखनऊत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांची भेट घेणार असल्याचे समजते आहे.

तसेच टीडीपी प्रमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सुधाकर रेड्डी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांचीही चंद्रबाबू नायडू भेट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या वेगवान हालचालींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x