27 January 2025 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

व्यंकय्या नायडूंना राष्ट्रवादी पक्ष पाठविणार ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणेची २० लाख पत्रं

NCP Yuvak Congress, 20 Lakh Letters, Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu

मुंबई, २३ जुलै : राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना २० लाख पत्रं पाठवण्यात येणार आहेत. या सर्व पत्रांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा लिहिलेली असणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली होती. यानंतर व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत अशा घोषणा देऊ नये अशी समज दिली. याच पार्श्वभूमीवर ही पत्रं पाठवण्यात येणार आहेत.

काल राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीवेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती . त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली होती.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: The NCP Youth Congress will send 20 lakh letters to Vice President and Rajya Sabha Speaker Venkaiah Naidu. All these letters will have the slogan ‘Jai Bhavani, Jai Shivaji’ written on them.

News English Title: NCP Yuvak Congress 20 Lakh Letters To Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x