22 February 2025 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

राहुल गांधींवर राजकीय हल्ल्यांसोबत डिजिटल हल्ले सुरु? | आता इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी

Rahul Gandhi

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या ट्विटरवर कारवाईची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आता गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे मोर्चा वळविला आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई करावी, असे एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहिले आहे.

राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईलवर काय कारवाई केली, याची माहिती कंपनीच्या व्यक्तीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे द्यावे, एनसीपीसीआरने फेसबुकला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुलांच्या हक्काविषयी काम करणाऱ्या संस्थेने राहुल गांधींच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, की आमचे राजकारण निश्चित करून ट्विटर कंपनी व्यवसाय करत आहे. राजकारणी म्हणून मला हे आवडत नाही. हा भारताच्या लोकशाही संरचनेवरील हल्ला आहे. हा राहुल गांधींवरील हल्ला नाही. त्यावर ट्विटरने कायदेशीर नियमांच्या अधीन राहून कारवाई केल्याचे म्हटले आहे. ट्विटरची सेवा घेणाऱ्यांवर हे नियम बंधनकारक असल्याचेही ट्विटरने स्पष्ट केले.

ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले होते की, ‘जर नियमांचे उल्लंघन झाले तर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच ठेवणार आहोत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेकडो ट्विट फोटोवर यापूर्वी आम्ही कारवाई केली आहे. काही खासगी माहिती ही इतरांच्या तुलनेत धोकादायक असते. प्रत्येकाची गोपनीयता आणि सुरक्षेचे संरक्षण करण्याचे आमचे ध्येय आहे. ट्विटरचे नियम आणि नियमांचे उल्लंघन होऊ शकणाऱ्या बाबी याबाबत आमच्या सेवा चांगल्या परिचित करून घ्या, यासाठी आम्ही प्रत्येकाला प्रोत्साहन देत आहोत.

पीडितेची ओळख उघड केल्याने ट्विटरने राहुल गांधींच्या ट्विटरवर अकाउंटवर केली होती कारवाई:
6 ऑगस्टला ट्विटरने राहुल गांधींचे ट्विट काढले होते. कारण, त्यांनी दिल्लीमधील बलात्कार पीडितेची ओळख जाहीर केली होती. ही पीडिता अल्पवयीन होती. पोक्सो कायद्यानुसार पीडितेची ओळख उघड करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCPCR demands action against Instagram profile of congress leader Rahul Gandhi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x