22 November 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कोरोनानंतर आफ्रिकेतील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्ग

Covid 19, Ebola Outbreak

किंशासा, २ जून: जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळं भारतात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागांमध्ये या व्हायरसचा होणारा प्रादुर्भाव पाहता त्यामुळं प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढे बरीच आव्हानं पाहायला मिळत आहेत. यातीलच सर्वाधिक मोठं आव्हान म्हणजे देशातील रुग्णांचा सातत्यानं वाढणारा आकडा.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा १९८७०६ वर पोहोचला आहे. तर, आतापर्यंत या व्हायरसच्या विळख्यात आल्यामुळं ५५९८ जणांचा जीव गेला आहे. मागील चोवीस तासांमध्ये कोरोमा रुची झपाट्यानं वाढ झाल्यामुळं ही चिंतेची बाब ठरत आहे.

जगभरातल्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असताना आफ्रिकेमधील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्ग होत असल्याची माहिती समोर आली आहे. काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने वांगाटा भागात आतापर्यंत इबोलाचे ६ रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली.धक्कादायक म्हणजे या ६ रुग्णांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर उपचार सुरू आहेत. हा काँगोमधील इबोलाचा ११ वा उद्रेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

एप्रिल महिन्यातच येथील बेनी शहरात इबोलामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. तर आता या ठिकाणापासून जवळजवळ हजार किलोमीटर दूर असलेल्या म्बानडाका शहरामध्ये इबोलाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग इतक्या लांब अंतरावर कसा झाला याबाबत तर्क वितर्क मांडले जात आहेत.

काँगोचे आरोग्यमंत्री एटेनी लोंगोंडो यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित भागांमध्ये डॉक्टरांचे विशेष पथक आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. लोगोंडो यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

 

News English Summary: Ebola has been reported in more than 200 countries around the world, while the Congo in Africa is being infected with the deadly Ebola virus. The Congolese health ministry said six Ebola cases had been reported in the Wangata area so far.

News English Title: New Ebola outbreak in west Congo kills four News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x