25 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

देशात गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद , तर २००३ रुग्णांचा मृत्यू

Corona Patients, Covid 19, India

नवी दिल्ली, १७ जून : देशात कोरोनाबाधितांचा आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. गेल्या २४ तासांत १० हजार ९७४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २००३ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख ८६ हजार ९३५ झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ११ हजार ९०३ झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर २.९% वरून ३.४ झाला आहे.

देशात कोरोनाव्हायरसमुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर १०० दिवसांच्या आतच १० हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू १२ मार्चला झाला होता. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना केंद्राने आता कोरोना चाचणीची क्षमता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता दर दिवशी ३ लाख लोकांच्या चाचण्या करता येणार आहेत.

रेड झोन आणि हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या लोकांची चाचणी कऱणं आता अधिक सोपं होणार आहे. लक्षण असणाऱ्यांसोबतच लक्षण नसलेल्या लोकांचीही चाचणी करण्याचा प्रस्ताव आहे. देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपचारासाठीची सर्व उपकरणे अधिक संख्येने उपलब्ध असणं गरजेचं आहे.

 

News English Summary: The number of corona viruses and deaths in the country is increasing day by day. Today, for the fourth day in a row, the number of new patients is around 10,000. 10 thousand 974 new patients were registered in last 24 hours. In 2003, patients died.

News English Title: New patients increased and 2003 patients died in last 24 Hours New Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x