फडणवीसांवर केंद्रीय पातळीवर मोठी जवाबदारी मिळणार | बिहार विधानसभा निवडणूक मुख्य लक्ष
मुंबई, १४ ऑगस्ट : महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणाऱ्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाकडून आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभा निवडणूक जवळ आली असून या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना भाजपकडून प्रभारीपद देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे.
बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहतील, असं समजतं. गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही फडणवीस उपस्थित होते, अशी माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
बिहारमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत भाजपा आघाडी करुन निवडणूक लढवत आहे. मात्र निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांना बिहारच्या निवडणुकीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वात संधी देणार अशी चर्चा सुरु होती. त्याचाच एक भाग म्हणून बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
News English Summary: BJP leader Devendra Fadnavis, who is the Leader of Opposition in the Maharashtra Assembly, is likely to be given another major responsibility by the party.
News English Title: New responsibility from BJP to Devendra Fadnavis Will he be in charge in Bihar Assembly elections News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय