19 April 2025 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

१० पैकी ९ पुरुषांना पत्नी संबंधीत या गोष्टी लक्षात राहात नाहीत | तुम्ही त्यातलेच का? बायकांनो तुमचे पती असेच का?

Human Fact

मुंबई, ११ जुलै | मुंबईत घेतलेल्या या सर्वेक्षणातून काही रंजक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यात सहभागी झालेल्या पुरुषांनी आपल्या पत्नीच्या मोबाईल क्रमांकाबद्दल सांगताना या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातल्या काही जणांच्या लक्षात त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक नाहीच. काहींच्या फोनमध्ये नंबर सेव्ह्ड आहे. काही लोकांनी मात्र नंबर सेव्ह असूनही पत्नीला फोन केल्यास ती फोन उचलत नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींनी त्याहीपुढे जाऊन पत्नीच लक्षात राहात नाही तर तिचा फोन क्रमांक कसा लक्षात राहील असाही युक्तिवाद केला आहे.

मुंबईत राहणाऱ्या दहापैकी नऊ पुरुषांना अपल्या पत्नीचा मोबाईल क्रमांक लक्षात राहात नसल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यांचा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असल्याने लक्षात राहात नसल्याचे आणि नंबर पाठ नसल्याचे या पुरुषांनी म्हटले आहे.

स्वतःशिवाय कोणाचाच नंबर लक्षात नसल्याचे चित्र:
आज आपल्या प्रत्येकाकडेच असलेल्या मोबाईलमध्ये माहिती साठवण्याची आणि ही सर्व माहिती क्षणार्धात उपलब्ध होण्याची सुविधा असल्यामुळे आपला स्वतःचा सोडता इतरांचे मोबाईल क्रमांक आपल्याला पाठ नसणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे मुंबई पुरुषांनाही आपल्या पत्नीचा मोबाईल क्रमांक पाठ नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मोबाईल थोड्याच लोकांकडे असल्यामुळे बाकी सर्वांना इतर बऱ्याच जणांचे फोन नंबर मुखोद्गत असत. मात्र आता चित्र बदलले आहे. पण ज्यांच्याकडे अद्याप मोबाईल फोन आलेले नाहीत अशा लहान मुलांना मात्र आपल्या आईबाबांचे आणि घरचे नंबर तोंडपाठ असल्याचेही दिसून आले आहे.

काहीजणांना फक्त पाठ आहे आपल्या वरिष्ठाचा नंबर
फोन नंबर पाठ न करता आपल्या मोबाईलमध्ये फीड करून ठेवण्याबाबत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण एकाच ओळीत येतात. स्मार्टफोनच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्वजण बहुतेक वेळ ऑनलाईन असतात. त्यामुळे सर्वच वयाच्या, धर्मांच्या, जातींच्या, ठिकाणच्या लोकांना बहुतेकदा फक्त आपला स्वतःचा नंबर तेवढा पाठ असतो आणि बाकी सगळे फोन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असतात. यातल्या काही जणांनी मात्र स्वतःच्या नंबरशिवाय फक्त आपल्या वरिष्ठाचा नंबर लक्षात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Nine out of ten men do not remember their wives number says survey news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या