22 November 2024 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

वाहनांची कागदपत्रे हरवणे अथवा विसरण्याची चिंता मिटली | डिजिटल ट्रॅफीक पोलिस

No need, Carry license pocket, traffic police

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर : वाहनचालकांसाठी खूशखबर आहे. केंद्र सरकारने वाहन परवाना, चालक परवाना, पीयुसी, इन्शुरन्स आदी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता ही कागदपत्रे हरवण्याची किंवा खिशात सांभाळून ठेवण्याची चिंता मिटली आहे. शिवाय पोलिसही आता ऑनलाईनच कागदपत्रे तपासू शकणार आहेत. यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा देण्यात आली आहे.

मंत्रालयाने म्हटलं आहे की, विभागाने केंद्रीय मोटर वाहन नियमात सुधारणा केली आहे. याअंतर्गत, वाहनांशी संबंधित परवाने, नोंदणीची कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्र, परवानग्या इत्यादींशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे शासकीय वेब पोर्टलच्या माध्यमातून नोंदी ठेवण्यात येणार आहेत. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो, परंतु हा केवळ मार्ग शोधण्यासाठी नेव्हिगेशनसाठीच असावा. तसेच, हे देखील लक्षात घ्यावे लागेल की, यावेळी वाहन चालवण्याद्वारे लक्ष विचलित होऊ नये.

गाडी चालवताना खोटे कागदपत्र दाखवून ट्रॅफीक पोलिसांकडून सुटका करता येऊ शकते असा अनेकांचा गैरसमज आहे. बऱ्याचदा पोलिसांकडून कागदपत्रांची सत्यता पडताळणी होत नाही हे सत्य आहे. पण यापुढे असं होणार नाही. आता वाहतूक पोलिसांकडे तुमची कागदपत्रे आधीच असतील.

फसवू नाही शकत:
केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये संशोधन केले आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून वाहतूक संदर्भातील नियमांमध्ये महत्वाचे बदल केले आहे. ड्रायव्हींग लायसन्स आणि ई चलान सहित वाहनांशी संबधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये अधिकृत आढळलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होणार नाही.

लायसन्सची अधिकृत माहिती:
ट्रॅफीक पोलिसांकडे तुमच्या ड्रायव्हींग लायसन्स संदर्भातील सर्व माहीती आधीच असणार आहे. तसेच रद्द किंवा अवैध झालेल्या लायसन्सची माहिती देखील यावर असणार आहे. ही माहीती वेळोवेळी अपडेट केली जाणार आहे.

मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये मोटर वाहन नियमांमध्ये महत्वाचे बदल आहेत. यानुसार १ ऑक्टोबर पासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहितीची वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होईल.

 

News English Summary: There is good news for motorists. The central government has allowed documents like driver’s license, driver’s license, PUC, insurance etc. to be kept in digital format. This has eliminated the worry of losing or keeping these documents in one’s pocket. In addition, the police will now be able to check documents online. For this, they have been given a state-of-the-art system.

News English Title: No need to carry license in the pocket traffic police would not even ask Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x