25 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024
x

परिस्थितीत वेगाने बदल | महाराष्ट्रच नव्हे आता देशातील 80 टक्के कोरोना रुग्ण इतर राज्यात

India corona pandemic

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.

मात्र, आता ३ लाख नव्या रुग्णांत महाराष्ट्रातील फक्त २०% रुग्ण आहेत. उर्वरित ८०% इतर राज्यांतील आहेत. विशेष म्हणजे देशातील निम्मे रुग्ण फक्त महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत आढळत आहेत. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग केरळमध्ये आहे. येथे निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर रुग्णसंख्या ३ हजारांवरून २२ हजारांवर गेली आहे.

दरम्यान, देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल. 2021 च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर 2022 च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असे भाकीत भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची ही लढाई आता भारताला दीर्घकाळ लढावी लागणार, हे आता स्पष्ट होत आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया यांनी यासंदर्भात भाष्य केले. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला असल्याचे त्यांनी म्हटले.

 

News English Summary: Now out of 3 lakh new patients, only 20% are from Maharashtra. The remaining 80% are from other states. In particular, half of the country’s patients are found only in Maharashtra, Chhattisgarh, Karnataka, Uttar Pradesh and Delhi. The highest rate of growth is in Kerala. After the election, the number of patients has gone up from 3,000 to 22,000.

News English Title: Now out of 3 lakh new corona patients only 20 percent are from Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x