27 January 2025 10:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, श्रीमंत करणारी टाटा म्युच्युअल फंडाची योजना, 1,06,81,334 रुपये परतावा दिला Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर मालामाल करणार, 54 टक्क्यांच्या तेजीचे संकेत, व्हेंचुरा ब्रोकरेज बुलिश - NSE: ADANIPOWER IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे
x

प्रियंका गांधी नवऱ्याचं कमी, माझ्याच नावाचा जास्त जप करतायत : स्मृती इराणी

Smriti Irani, Priyanka Gandhi, Congress, Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांना मागील ५ वर्षात माझं नाव माहिती नव्हतं.परंतु, आता ते सातत्याने माझ्या नावाचा जप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे. अमेठीत प्रसार माध्यमांशी त्या बोलत होत्या.

इराणी म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात माझं नाव माहिती नसलेल्या प्रियंका गांधी आता सातत्याने माझं नाव उच्चारत आहेत. सध्या त्या आपल्या पतीचे नाव कमी आणि माझंच नाव जास्त उच्चारत आहेत. यावरुन माझा अमेठीतला प्रचार यशस्वी झाला असल्याचीच ही पावती आहे.

दरम्यान, अमेठीतील एका घटनेचा दाखला देताना इराणींनी गांधी कुटुंबावर कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, राहुल गांधी ट्रस्टी असलेल्या अमेठीतील रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. या रुग्णाकडे आयुष्यमान भारतचे कार्ड असल्याने त्याला उपचार नाकारण्यात आले आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा दावा यावेळी त्यांनी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x