18 April 2025 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

देशभरात २४ तासात 3 लाख 50 हजार 598 नवे रुग्ण | तर 3,071 रुग्णांचा मृत्यू

India corona pandemic

नवी दिल्ली, ०३ एप्रिल | भारतात कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना दिसत आहे. मागील 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.

भारतात व्हायरसचा प्रकोप किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याचा ताज्या आकडेवारीवरुन येऊ शकतो. शनिवारी जगाच्या टॉप-50 संक्रमित देशांमध्ये मिळून 3.91 लाख लोक संक्रमित आढळले, तर एकट्या भारतामध्ये 3 लाख 92 हजार 459 रुग्ण आढळले. म्हणजेच 50 देशांमधील एकूण रुग्णांपेक्षा एक हजार जास्त रुग्ण भारतात आढळले.

गेल्या 24 तासांमध्ये 2 दिलासादायक वृत्त समोर आले आहेत. पहिले हे की शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी संक्रमितांच्या संख्येमध्ये 9555 ची घट झाली आहे. शुक्रवारी देशामध्ये विक्रमी 4 लाख 2 हजार 14 लोक संक्रमित आढळले. जे शनिवारी कमी होऊन 3 लाख 92 हजार 459 वर पोहोचले. दुसरीकडे गेल्या 24 तासांमध्ये जगात सर्वात जास्त मृत्यू भारतामध्ये झाले आहेत. येथे 3,684 रुग्णांनी जीव गमावला आहे. ब्राझीलमध्ये मृतांची संख्या 2,278 होती. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका होते. येथे शनिवारी 661 लोकांनी जीव गमावला.

दरम्यान, देशभरात मागील काही काळापासून कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. दररोज जवळपास चार लाख नवे रुग्ण समोर येत आहेत. अशात परिस्थितीत कोरोनासोबत लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. न्यायालयानं कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचा सल्लाही दिला आहे. याशिवाय लस खरेदीची पॉलिसीही पुन्हा एकदा बदलण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायालयानं असं म्हटलं आहे, की जर तसं केलं नाही तर हा सार्वजनिक आरोग्याच्या अधिकारास अडथळा असेल, जो घटनेच्या कलम 21 मधील अविभाज्य भाग आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, एल नागेश्वर राव आणि एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने असंही म्हटलं आहे, की लॉकडाऊन करण्यापूर्वी त्याचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी होईल याची काळजी सरकारने घ्यावी. न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना लॉकडाऊनचा त्रास होऊ शकतो त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था केली पाहिजे.

 

News English Summary: In India, the corona is getting stronger day by day. In the last 12 days, more than three lakh new corona patients have been coming forward. Once again on Sunday, 3 lakh 50 thousand 598 new patients have come forward. So 3,071 patients have lost their lives. Today, the number of patients recovering was 2 lakh 79 thousand 882. The total number of infections has now reached close to two crore. Today, the number has crossed 1.99 crore.

News English Title: On Sunday 3 lakh 50 thousand 598 new patients recorded in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या