2 February 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो, ही SBI म्युच्युअल फंड योजना महिना 3500 रुपये SIP वर देईल 2 कोटी रुपये परतावा New Income Tax Slab | 12 लाख ते 50 लाख रुपये उत्पन्नावर किती टॅक्स भरावा लागेल आणि बचत किती होईल जाणून घ्या Smart Investment | तुमचा महिना पगार कितीही असला तरी 'या' 3 पर्यायांमध्ये पैसे गुंतवा, कधीच आर्थिक कोंडी होणार नाही 5G Smartphone | स्मार्टफोन प्रेमींनो 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा बजेट तयार ठेवा, कोणते नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार CIBIL Score | 'या' 6 सोप्या स्टेप्समुळे तुमचा सिबिल स्कोर भराभर वाढवेल, 500 हून थेट 800 चा आकडा गाठेल, असं शक्य होइल Home Loan EMI | वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेण्याचा प्लॅन करताय, मग, या 4 गोष्टी लक्षात ठेवा, कर्जाचा डोंगर हलका होईल Mutual Fund SIP | 50 लाखांचे घर खरेदी करताय, मग किती रुपयांची SIP करावी लागेल, मोठी रक्कम कशी मिळेल पहा
x

जगातील मोठा पक्ष आजही काँग्रेस नेत्यांच्या फोडाफोडी भरोसे निवडणूक रिंगणात - सविस्तर

Gujarat Congress MLA, Resigned, Rajaya Sabha Election 2020

अहमदाबाद, ५ जून : गुजरातमध्ये राज्यसभा निवडणूक होत असून, त्यापूर्वी राजकीय धक्के जाणवू लागले आहेत. काँग्रेसनं दोन उमेदवार उतरवले असून, भाजपानं तीन उमेदवार दिले आहेत. भाजपानं संख्याबळ नसताना तिसऱ्या जागेची खेळी केली आहे. ती यशस्वी होताना दिसत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी गुरूवारी राजीनामे दिले होते. त्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानं राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांची संख्या ८ वर गेली आहे.

आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे. मोरबीचे काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे. याआधी कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि कपराडाचे आमदार जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला होता. तर याआधी मार्च महिन्यात काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६८ पर्यंत खाली आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ८१ जागा जिंकल्या होत्या.

नियमांनुसार, राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी उमेदवाराकडे सिंगल ट्रासफरेबल वोट अंतर्गत ३६ मतांची गरज असते. भाजपाकडे १०३ आमदार आहेत, भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे.

यावेळी गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन (बीटीपी) आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३६ मते आवश्यक आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेस २ बीटीपी आमदार व एक अपक्ष अशी त्यांची संख्या ७१ मानत होती. अशा प्रकारे काँग्रेस सहजपणे २ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहत होती. दुसरीकडे ३ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपला १०६ आमदारांची गरज भासणार आहे. याचा अर्थ असा की भाजपाला तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आणखी ३ मतांची आवश्यकता असेल. तिसरा उमेदवार म्हणून भाजपाने नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे.

 

News English Summary: With the Rajya Sabha elections taking place in Gujarat, political shocks are already being felt. Congress has fielded two candidates while BJP has fielded three candidates. BJP has bagged the third position without any strength. She seems to be succeeding.

News English Title: One More Gujarat Congress MLA Resigns News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x