15 January 2025 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

दुःखद बातमी | टिकरी सीमेवर अजून एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू

Protestant farmer death, Tikri Border, Bharat Bandh

नवी दिल्ली, ८ डिसेंबर: केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.

या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.

दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समोर (One more protestant farmer death at Tikari Border) आले आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला होता. सोमवारी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर या शेतकऱ्याला बहादूरगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या शेतकऱ्याला हॉर्ट अटॅक आला होता. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा शेतकरी पहिल्या दिवसापासून टिकरी बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झाला (The farmer death at Tikari Border was inloved in farmers protest since first day) होता. तर गेल्या बुधवारीही बहादूरगड बॉर्डवर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. प्रसार माध्यमांना मिळलेल्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान गेल्या बारा दिवसांत या आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही शेतकरी आंदोलन करत असून आपल्या मागण्यावंर ठाम आहेत. आपल्या घरांपासून लांब, थंडी असली तरी काळजी न करता शेतकरी दिल्लीच्या बॉर्डवर ठाण मांडून बसले आहेत. दीर्घ संघर्षासाठी तयार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही. यासाठी जर महिने रस्त्यावर घालवायचे असतील तरीही मागे हटणार नाही. रेशनपासून औषधांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

News English Summary: Another farmer dead during the agitation (One more protestant farmer died at Tikari Border). The farmer had joined the agitation on the Tikri border. On Monday, his health suddenly deteriorated. The farmer was later admitted to a hospital in Bahadurgarh. According to doctors, the farmer had a heart attack. However, he died this morning during treatment.

News English Title: One more protestant farmer death at Tikri Border news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x