तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपचा मोठा पराभव होणार | विधानसभा निवडणूकपूर्व सर्व्हे
नवी दिल्ली, ०९ मार्च: देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पानीपत होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ आणि सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार येणार असून तामिळनाडूत काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर केरळात पुन्हा एकदा डाव्यांचंच पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे या तिन्ही मोठ्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागणार आहे. (Opinion poll Times Now and C Voter survey predicts victory for incumbent BJP gains in Bengal)
पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या चार राज्यांचा एक सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. एलडीएफला एकूण 140 जागांपैकी 82 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर युनायटेड ड्रेमोक्रॅटिक फ्रंट 56 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षाला केवळ एक सीट मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल:
पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भारतीय जनता पक्षाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भारतीय जनता पक्षाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.
आसाम:
आसाममधील निवडणुकीमध्ये १२६ जागांपैकी ६७ जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना मिळतील तर ५७ जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना यश मिळेल असा अंदाज आहे. २०१६ साली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना ८६ तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आलेला.
तामिळनाडू:
तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लाढाई एआयएडीएमके आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला २३४ पैकी डीएमकेला १५८ जागा मिळत असं सांगितलं जात आहे. तर एआयएडीएमके आणि भारतीय जनता पक्षाला ६५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज या सर्वेक्षणामधून बांधण्यात आलाय.
केरळ:
केरळमध्ये १४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये ८२ जागांवर एलडीएफचा विजय होईल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि युडीएफला केरळमध्ये ५६ जागांवर विजय मिळेल असं या सर्वेेक्षणामधून दिसत आहे. तर भारतीय जनता पक्षाला मागील निवडणुकीप्रमाणे केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल असं सांगितलं जात आहे.
पुद्दुचेरी:
पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या ३० जागांपैकी १८ जागांवर भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज बांधला जातोय.
News English Summary: In the Assembly elections taking place in four states and one Union Territory of the country, the Bharatiya Janata Party is seen in Panipat. According to a Times Now and C-Voter survey, Mamata Banerjee’s government will return to power in West Bengal and the Congress-led government in Tamil Nadu. In Kerala, the Left is expected to return once again. This means that the Bharatiya Janata Party will have to face a big defeat in these three big states.
News English Title: Opinion poll Times Now and C Voter survey predicts victory for incumbent BJP gains in Bengal news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय