23 February 2025 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर - ओवेसी

Owaisi MIM, PM Narendra Modi, PM Garib Kalyan Yojana Scheme

नवी दिल्ली, ३० जून : नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

दरम्यान मोदींनी होऊ घातलेल्या अनेक सणांचा उल्लेख केला. यापूर्वी त्यांनी संवादात चीनचा उल्लेख टाळला होता तर आज एका भारतीय सणाचा उल्लेख टाळल्याने चर्चा रंगली आहे. यावरून एमआयएमचे सर्वेसेवा ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचं होतं पण ते बोलले चण्यावर. एका अर्थाने हे सुद्धा गरजेचं होतं. कारण कोणताही विचार न करता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे या देशातील अनेक गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागले होते, अशा शब्दांत ओवेसींनी मोदींवर टीका केली आहे.

यादरम्यान आपल्या भाषणात बकरी ईदचा उल्लेख न केल्यामुळेही ओवेसींनी मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे. मोदींनी मंगळवारी केलेल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी App बंद केल्यानंतर मोदी सरकारची भूमिका मांडतील अशी अनेकांना अपेक्षा होती, परंतू मोदींनी आपल्या भाषणात चीनचा उल्लेख टाळला. दरम्यान आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी, अनलॉक १ पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन होताना दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.

 

News English Summary: Owaisi, MIM’s survey service, has targeted Modi. The Prime Minister wanted to talk about China today, but he did not. In a sense, this was necessary. Owaisi has criticized Modi for saying that the lockdown imposed without any thought had forced many of the country’s poor to go without food.

News English Title: Owaisi MIM slams PM Narendra Modi over PM Garib Kalyan Yojana Scheme News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x