22 November 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

परिस्थिती भयानक | दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

Delhi Oxygen Shortage

नवी दिल्ली, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला.

दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं दिल्ली हादरलेली असतानाच दिल्लीत नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत करोनामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाचं ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

News English Summary: Delhi Oxygen supply to last only half an hour now, more than 200 lives are at stake. We lost 20 people due to an oxygen shortage last night: DK Baluja, Jaipur Golden Hospital news updates.

News English Title: Oxygen Shortage In Delhi 20 Covid Patients Die Due To Oxygen Shortage Jaipur Golden Hospital news updates.

हॅशटॅग्स

#Delhi(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x