21 November 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदींचा मतदारसंघ वाराणसीत काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन | नव्या रुग्णांना नो इंट्री

Oxygen shortage

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वारणासीमध्ये केवळ आज संध्याकाळपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करुन घेऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी (२२ एप्रिल २०२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास हाती आलेल्या माहितीप्रमाणे केवळ १० तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा वाराणसीमधील रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईमुळे जिल्हाधिकारी कौशल राज शर्म यांनी सर्व खासगी रुग्णालयांसाठी निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत, असं सांगण्यात आलं आहे. तसेच जोपर्यंत करोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येत नाही तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करुन घेऊ नये असंही या निर्देशांमध्ये म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशांनुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, असे सांगण्यात आले आहे. तसेच जोपर्यंत कोरोना रुग्णालयांमध्ये सध्या दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना दाखल करून घेऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाराणसी जिल्ह्यात दररोज जवळपास ३ हजार ४०० ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा होत असतो. मात्र, ऑक्सिजनच्या टंचाईमुळे रिफिलिंग करून पुन्हा रुग्णालयांना दिला जात आहे.

 

News English Summary: The second wave of corona has caused oxygen shortages across the country. On the other hand, Varanasi, the Lok Sabha constituency of Prime Minister Narendra Modi, has enough oxygen stock till this evening. The situation is so serious that hospitalized patients have been told not to admit new patients without discharging them.

News English Title: Oxygen shortage in PM Narendra Modi’s Varanasi Loksabha constituency corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x