महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | भारत पेट्रोलियम मुंबईत 87 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2021. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ने 87 पदवीधर आणि तांत्रिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार 21 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी बीपीसीएल भरती 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | या 4 पद्धतीने करा कोरफडीचे सेवन | गोठलेल्या चरबीपासून होईल सुटका
शरीरातील फॅट्स (Belly Fat) कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. परंतु तरी देखील त्याचा फारसा परिणाम होत नाही. वजन वाढवणे खूप सोपे आहे. मात्र ते कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. गोठलेली चरबी कमी करणे खूप कठीण आहे. यातून सुटका मिळवण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच आहारात काही फॅट बर्नर खाद्यपदार्थांचाही समावेश करणे गरजेचे ठरते. कोरफड हा देखील एक उत्तम फॅट बर्नर आहे. फॅट कमी करण्यासाठी आपण 5 प्रकारे कोरफडीचे सेवन (Aloe Vera for Belly Fat) करू शकता.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | कंगना रणौतला अटक वॉरंट जारी करण्याचा न्यायाधिशांचा इशारा
गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाला न्यायालयात हजर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही ती न्यायालयात दाखल झाली नाही. कंगना जर पुढील तारखेस हजर राहिली नाही तर तिला अटक वॉरंट जारी करण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Modak Roll Recipe Madhura Swad | बाप्पासाठी तयार करा 'मोदक रोल' - नक्की ट्राय करा
बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. गणेशोत्सव म्हटलं की नैवेद्यात सर्वात आधी तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. मोदकाचे अनेक प्रकार आहेत घरोघरी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही तयार केले जातात. पण मोदक तयार करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. बऱ्याचदा मोदक करण्यासाठी (Modak Roll Recipe Madhura Swad) केलेले प्रयत्न फसतो. ज्यांना मोदक तयार करणे कठीण वाटते किंवा तयार करता येत नाही अशासाठी आज आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहे.
3 वर्षांपूर्वी -
ICAI CA Foundation Final Results 2021 | CA अंतिम परीक्षेत बहिण नंदिनी देशातून पहिली तर भाऊ सचिन 18 वा रँक
जिल्ह्यातील चंबल अंचल येथील बहिण-भावाच्या जोडीमुळे चंबल अंचलचे नाव उंचावले आहे. बहिण नंदिनी अग्रवाल हिने चार्टर्ड अकाऊंटेड (सीए) परीक्षेत भारतातून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे 19 वर्षीय नंदिनीने पहिल्याच प्रयत्नात हे उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भाऊ सचिन अग्रवालला 18 वी रँक प्राप्त झाली आहे. या दोघांच्याही यशाचं कौतूक करत प्रसार माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातचा विकास होतोय, तर मुख्यमंत्री रातोरात का बदलला? | मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही हाच मोदींचा संदेश - शिवसेना
गुजरातचा विकास, प्रगतीचे मॉडेल आणि गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेने खोचक टीका केली आहे. ‘पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?’ असा बोचरा सवाल शिवसेनेने दैनिक सामनाच्या माध्यमातून केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी नवीन विधेयकाची तयारी | फीस देऊन नागरिकत्त्वाचा मार्ग होऊ शकतो मोकळा
अनेक वर्षांपासून अमेरिकेचे नागरिकत्व शोधत असलेल्या लोकांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. अमेरिकन संसद एका विधेयकावर विचार करत आहे ज्यामध्ये ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या लोकांना काही शुल्क आणि काही अटी पूर्ण केल्यानंतर नागरिकत्व मिळेल. खरंतर, विधेयक अद्याप अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या प्रक्रियेस बराच वेळ लागू शकतो. ग्रीन कार्डचा बॅकलॉग खूप मोठा असतो आणि लाखो लोक विशेषत: आयटी व्यावसायिक त्याला बळी पडतात. त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या कामाच्या व्हिसाचे नूतनीकरण करावे लागते.
3 वर्षांपूर्वी -
रेशन कार्डावर मोबाईल नंबर अपडेट कसा करायचा? | जाणून घ्या सोपी पद्धत
रेशन कार्ड (Ration Card Member) हे खासगी कामासह शासकीय कामातही एक महत्त्वपूर्ण कागदपत्रं मानलं जातं. याद्वारे तुम्हाला फक्त स्वस्त किंमतीतील धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे रेशन कार्डचा उपयोग हा विविध कागदपत्र बनवण्यासाठीही केला जातो.
3 वर्षांपूर्वी -
Health First | तुमचा स्मार्टफोन स्मार्टली तुमचं आरोग्य करतोय खराब - नक्की वाचा
भ्रमणध्वनी म्हणा नाहीतर मोबाईल तो आजकाल इतका समर्थ झालाय कि त्याच्यासमोर माणसाची बुद्धी चालेनाशी झाली आहे. त्याच झाली असं कि एकवेळ खाणंपिणं देऊ नका पण मोबाईल माझा नेऊ नका अशी अवस्था आजकाल प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे उठताना फोन, बस्तान फोन, जेवताना फोन, झोपताना फोन. आपल्या संपूर्ण दिनचर्येत फोनपेक्षा जास्त आणि फोनपेक्षा अधिक असं दुसरं काहीच उरलेलं नाही. निश्चितच एका क्लीकवर आपण जगातील कुठल्याही कोपऱ्यात संपर्क साधू शकतो. शिवाय मोबाईलच्या नवनवीन फीचरमुळे आपणही आधुनिक विश्वात पदार्पण करीत आहोत. आता हे सगळं कितीही मान्य असलं तरीही मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आपण दुर्लक्षित करू शकत नाही.
3 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात विरोधकांचे महागाईविरोधात आंदोलन | डीके शिवकुमार आणि सिद्धारामय्या बैलगाडीवरून विधानसभेत
कर्नाटक काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या दरवाढी विरोधात सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या बैलगाड्यांवरून विधानसभेत पोहोचले. कर्नाटक विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी ही रणनीती आखली.
3 वर्षांपूर्वी -
पेगॅसस स्पायवेअर | राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली तुम्ही मागे फिरू शकत नाही, पत्रकार आणि सेलिब्रिटींची हेरगिरी गंभीर - सुप्रीम कोर्ट
इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा गैरवापर करून पत्रकार, न्यायाधीश, राजकीय नेते यांच्यावर सरकारने पाळत ठेवल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर प्रतिसाद देण्यास सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला अधिक काळ दिल्याचे म्हणत या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी १७ ऑगस्ट रोजी केंद्राला पेगॅसस प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांना उत्तर देण्याबाबत एक नोटीस जारी केली होती.
3 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांची कर्नाटक नीती | पटेल समाजाचा मुख्यमंत्री बसवून नितीन पटेल यांचे पंख छाटले? - सविस्तर वृत्त
२७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मला भाजपात प्रवेश करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती - आ. श्रीमंत पाटील
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पाडण्यापूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैसे देऊ केले होते, असं भाजपचे आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील यांनी रविवारी सांगितलं. मात्र “मी भारतीय जनता पक्षाची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय. मला पैसे नकोय, तर मला केवळ मंत्रीपद पाहिजे होतं. परंतु, मागणी करूनही मला मंत्रीपद देण्यात आलं नाही,” असंही पाटील म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
JEE Main Result 2021 | जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल | इथे पाहा निकाल
Jee Main Result 2021. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. निकालासोबत एनटीए जेईई मेन चौथ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका, कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकिंग देखील जाहीर करेल अशी माहिती आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये तालिबानी कायदा ? | कॅम्पसमध्ये मुलींना बुरखा घालण्याचे आदेश
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात खूप गोंधळ झालेला पाहायला मिळाला आहे. भागलपूर येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींनी शनिवारी दुपारी वसतिगृह अधीक्षकांनी कॅम्पसमध्ये बुरखा घालण्याचे निर्देश दिल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. या दरम्यान विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या गेटवर दगडफेक केली. त्यांनी आरोप केला की वसतिगृह अधीक्षक कॅम्पसमध्ये तालिबानचा शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा 30 जून 2022 पर्यंत घेता येणार लाभ | नोकरी गेल्यास सरकार भत्ता देणार
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) ‘अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजना’ 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, या योजनेचा लाभ 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता. परंतु, या योजनेत वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत याचा लाभ घेता येणार आहे. अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेत आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात या योजनेचा लाभ आणखी काही लोकांना घेता यावा यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येताच उपमुख्यमंत्री नितीन पटेलांची बंडाची भाषा? | भाजपमध्ये धाकधूक
गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणार तसे मृत्यू प्रमाणपत्र | केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितली नियमावली
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोरोनाशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत ‘अधिकृत कागदपत्रांसाठी’ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने असेही म्हटले आहे की, भारतीय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाने मृतांच्या नातेवाइकांना मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले होते.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत | मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ | इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट रिपोर्ट
ऑगस्टमध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने मुंबईचा जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत समावेश केला. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्र वेगळीच कहाणी सांगते. मुंबईत ४ महिन्यांत महिलांवरील अपराध १३३% वाढले आहेत. वरिष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘मुंबई पोलिस आपली सर्व ऊर्जा सुशांतसिंह व राज कुंद्रा प्रकरणात लावत आहे. दिल्ली निर्भया प्रकरणानंतर मृत्युदंडाचा कायदा झाला. मात्र आजवर किती दोषींना फासावर लटकावले?
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS