महत्वाच्या बातम्या
-
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.
4 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येताच उपमुख्यमंत्री नितीन पटेलांची बंडाची भाषा? | भाजपमध्ये धाकधूक
गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळणार तसे मृत्यू प्रमाणपत्र | केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितली नियमावली
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोरोनाशी संबंधित मृत्यूंच्या बाबतीत ‘अधिकृत कागदपत्रांसाठी’ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने असेही म्हटले आहे की, भारतीय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाने मृतांच्या नातेवाइकांना मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत | मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ | इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट रिपोर्ट
ऑगस्टमध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने मुंबईचा जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत समावेश केला. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्र वेगळीच कहाणी सांगते. मुंबईत ४ महिन्यांत महिलांवरील अपराध १३३% वाढले आहेत. वरिष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘मुंबई पोलिस आपली सर्व ऊर्जा सुशांतसिंह व राज कुंद्रा प्रकरणात लावत आहे. दिल्ली निर्भया प्रकरणानंतर मृत्युदंडाचा कायदा झाला. मात्र आजवर किती दोषींना फासावर लटकावले?
4 वर्षांपूर्वी -
योगी यांच्यासाठी उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे प. बंगालच्या पायाभूत सुविधांचे फोटो चोरून वापरने - अभिषेक बॅनर्जी
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच उत्तर प्रदेशात कोरोनामुळे स्थिती अत्यंत भीषण असल्याचं देखील देशाने अनुभवलं आहे. परिणामी योगी सरकारसाठी आगामी निवडणुका कठीण झाल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
फेकावं तर भाजपनेच | उत्तर प्रदेशच्या विकासाच्या जाहिरातीत प. बंगालचे रस्ते आणि फ्लाय-ओव्हर
देशात सर्वांचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ अगदी काही महिन्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणामी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकही तयारीला लागले आहेत. दुसरीकडे, कोरोनामुळे उध्दभवलेल्या आणि गंगा घाटातील वास्तवामुळे योगी सरकारची जगभर पोलखोल झाल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही | ५ वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं - संजय राऊत
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
RSS व भाजपाच्या ऑगस्टमधील गुप्त सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारीमुळे रुपाणींचा राजीनामा? - सविस्तर वृत्त
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | दुपारी जेवताना भात खाल्ला कि झोप का येते? | ही आहेत कारणे आणि उपाय
भात हा असा पदार्थ आहे ज्यात एकतर भरपूर विविधता मिळते. अर्थात उत्पादनात मिळतेच पण पदार्थांमध्येसुद्धा विविधता मिळते. पहा ना व्हेज पुलाव, तवा पुलाव, जिरा राईस, कढी राईस, दालखिचडी, दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी आणि अजून बरंच काही.. त्यामुळे भट खाणाऱ्यांची एक वेगळाच चाहता वर्ग आहे. अगदी साध्या वरणभातापासून निरनिराळ्या भाताचे प्रकार कित्येक लोक अगदी चवीने आणि मनसोक्त खातात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्ट्रेच मार्क्स? | आता चिंता सोडा आणि ह्या टिप्स वापरून पहा - नक्की वाचा
आजकाल वजन वाढणे हि समस्या इतकी मोठी झाली आहे कि चार लोकांच्या मागे दहा लोकांना हि समस्या आहेच. म्हणा वजन वाढण्यामागे अनेको कारणे असतात. पण मग वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हीच लोक नाही नाही ते उद्योग आणि प्रयोग करताना दिसतात. मग यासाठी खूपवेळा जिममध्ये घाम गाळणे असेल नाहीतर पद्धतीशीर डाएट करणे असेल. अश्या कोणत्या ना कोणत्या मार्गांचा अवलंब करून वजन कमी केले जाते. पण वजन कमी करण्यासोबत आणखी एक समस्या भेडसावते आणि हि समस्या म्हणजे वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | जवस खाल्ल्याने शरीर मजबूत आणि सौंदर्याला बहार येते - नक्की वाचा
आंतरीक आणि बाह्य सौंदर्य यांमध्ये बाह्य सौंदर्य लोकांना अधिक भाळते हे आपण सारेच जाणतो. कारण आपणही बाह्य सौंदर्यावर खूप मेहनत करतो. मग शरीर यष्टीसाठी जिम करणे, त्वचेसाठी ब्यूटी क्रिम आणि विविध थेरेपी वापरणे, असे बरेच काही ना काही उद्योग आपण करतो. पण एवढ्यासाठी केवढं कराल? म्हणून आम्ही तुमच्यासाठी पर्याय घेऊन आलो आहोत. तो ही साधा सोप्पा आणि सरळ. तुम्हाला जवस माहित आहेत? होय. होय. जवस. हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होतेच शिवाय सौंदर्य अगदी खुलून येते.
4 वर्षांपूर्वी -
McDonald's Immunity Booster | आता McD'मध्ये मसाला कडक चहा आणि हळदीचे दूधही मिळणार
मॅकडोनल्ड्स इंडिया आता रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देत आहे. त्यांनी हळदीचे दूध आणि मसाला कडक चाय अशी दोन उत्पादने त्यांच्या मॅकॅफे मेनूमध्ये जोडली आहेत. ही दोन्ही उत्पादने मॅकेफे आउटलेटवर उपलब्ध असतील.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून दिशाभूल | कोरोनामधील अराजकता व अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी वाढल्याने रुपाणींचा राजीनामा - हार्दिक पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातच्या विकासाची ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा उत्साह, नवी ऊर्जेसह पुढे जावी. हे लक्षात घेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं रुपाणी यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
कार्यकाळ पूर्ण होण्याच्या वर्षभरापूर्वीच रुपाणींनी मुख्यमंत्रीपद सोडले | आता मनसुख मंडाविया आघाडीवर
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यादव-मुस्लिम वोट बँके फोडून एमआयएम अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करतंय?
उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के मुस्लिम मतांची गोट बँक समाजवादी पार्टीबरोबर घट्ट बांधून टाकली आहे. ही वोट बँकच फोडण्याचा हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता पोस्टातून देखील मिळणार स्वस्त गृह कर्ज | कसं ते वाचा
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे.आता गृहकर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाव लागणार नाही.नजीकच्या पोस्ट ऑफिसमधूनही आता तुम्ही स्वत गृहकर्ज घेऊ शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (आयपीबीसी ) एलआयसी हाऊसिंग फायनान्स सोबत भागिदारी केली असून आयपीपीबीच्या 4.5 कोटी ग्राहकांना यामुळे एलआयसी-एचएफएलच्या गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल.
4 वर्षांपूर्वी -
Soil Health Card Scheme | मृदा आरोग्य कार्ड योजना 2021 | असा करा ऑनलाईन अर्ज? - नक्की वाचा
भारत सरकारच्या वतीने देशातील शेतकर्यांच्या हितासाठी सन 2015 मध्ये मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली गेली. या योजनेंतर्गत देशातील शेतकर्यांना जमिनीच्या माती गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत केली जाईल. या मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकर्यांना आरोग्य कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये शेतकर्यांच्या जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी (शेतकर्यांना जमिनीच्या मातीच्या प्रकाराविषयी माहिती दिली जाईल) व मातीची गुणवत्ता याची माहिती दिली जाईल आणि या योजनेच्या आधारे शेतकर्यांना चांगली पिके घेण्यास मदत होईल.
4 वर्षांपूर्वी -
Unique Health Card | आपले संपूर्ण मेडिकल रेकॉर्ड | देशात कोणत्याही रुग्णालयात मागील सर्व रिपोर्ट्स मिळणार
केंद्र सरकारने युनिक हेल्थ आयडी कार्ड बनवण्याची तयारी पूर्ण केली आहे. या कार्डमध्ये आरोग्याशी संंबंधित सर्व माहितीची नोंद असेल. तुम्हाला दुसऱ्या राज्यात किंवा शहरात जायचे असले तरी आपले मेडिकल रिपोर्ट्स सोबत नेण्याची गरज राहणार नाही. कारण तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री हेल्थ कार्डमध्ये नोंदलेली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (एनडीएचएम) लाँच करू शकतात. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये डॉक्टर, रुग्णालये, लॅब आणि केमिस्टचीही माहिती नोंदलेली असेल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | किचन बजेट कोलमडणार | 1 ऑक्टोबरपासून CNG व PNG महागणार
सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी पंतप्रधानांची बैठक | ऑक्सिजन पुरवठा, मुलांसाठी बेड व औषध व्यवस्थेवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा वेगाने वाढवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. त्यांनी राज्यांना औषधांचा बफर स्टॉक ठेवण्यास सांगितले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA