महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | घरच्या घरी करा दाबेली मसाला | बनवा चविष्ट दाबेली
स्ट्रीट फूड मध्ये प्रसिद्ध असणारा दाबेली हा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. दाबेली म्हटली की तोंडाला पाणीच सुटते. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरीत शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आता लगेचच खावीशी वाटते. बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतंच नाही. पण तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही दाबेली रेसिपी आणि दाबेलीचा मसाला आणली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कारल्याचा कडवटपणा असा दूर करून भाजीचा आनंद घ्या - वाचा टिप्स
कारले चवीला अतिशय कडवट असते पण आरोग्यासाठी मात्र अतिशय गुणकारी असते. मात्र कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. वास्तविक या भाजीमध्ये भरपूर अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन, बीटा कॅरेटीन, लोह, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉईड असे अनेक गुणकारी घटक असतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या सर्व घटकांशी शरीराला गरज असते.
4 वर्षांपूर्वी -
लग्नासाठी वर हवा | पण न पादणारा आणि ढेकर न देणारा नवरा पाहिजे | लग्नाची जाहिरात चर्चेत
भारतातील स्त्रीवादी विचार असलेले लोक, शक्यतो जीवनाचा साथीदार शोधण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विवाह विषयक जाहिरातींची मदत घेत नाहीत. वृत्तपत्रांमधील अशा प्रकारच्या बहुतांश जाहिराती या धर्म, जात यावर आधारित असतात. त्याचबरोबर या जाहिरातींमध्ये प्रामुख्यानं त्वचेचा रंग, उंची, चेहऱ्याचा आकार असे शारीरिक गुणधर्म यांची माहिती असते. तर अनेक जाहिरातींमध्ये सहा आकडी पगार, कुटुंबाची संपत्ती, मालमत्ता यांचाही उल्लेख असतो.
4 वर्षांपूर्वी -
वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचाही मुलांएवढाच हक्क असतो का? | माहिती असणं आवश्यक - वाचा सविस्तर
जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर केवळ तुमचाच अधिकार आहे तर थोडं थांबा! खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या अधिकारासंदर्भात अनेक नियम आणि कायदे अस्तित्वात आहेत. प्रकरण इतकं साधं-सरळ नाही. दिल्ली हायकोर्टात नुकतीच एक खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने सांगितलं की वडिलांच्या मालमत्तेवर पूर्णपणे मुलाचाच हक्क नसतो. कारण आई अजून जिवंत आहे आणि मालमत्तेवर मुलीचाही तेवढाच हक्क आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचा सुप्रीम कोर्टात यु-टूर्न | आधी मे महिन्यात 216 कोटी डोस उपलब्धतेचा दावा, आता डिसेंबरपर्यंत 135 कोटी डोस
देशात एकीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने लसींच्या उपलब्धतेवरुन सर्वोच्च न्यायालयात यू टर्न घेतला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत 135 कोटी डोस मिळणार असल्याचे सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टात मोदी सरकारचं प्रतिज्ञापत्र | पैसा आहे पण कोरोना मृतांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देऊ शकत नाही
कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दरम्यान, यामध्ये मृत कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. हा मुद्दा पैशाचा नसून संसाधनांचा योग्य वापर व्हावा असे कारण केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमदार-खासदारांना शरण आणण्याची ताकद ईडी आणि सीबीआय'मध्ये आहे - संजय राऊत
भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंल पत्र चर्चेचा विषय ठरला आहे. या पत्राचा धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी, सीबीआयच्या गैरवापरावरून केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कधीकाळी नरेंद्र मोदी, अमित शहांनादेखील त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंत्रणांमुळे होणाऱ्या मनस्तापाची त्यांना कल्पना असावी, असं राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या आजच्या (२७ जून) ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरात म्हटलं आहे
4 वर्षांपूर्वी -
Health First | या 5 पदार्थांच्या अतिसेवनामुळे सुटू शकतं तुमचं पोट - नक्की वाचा
हल्ली पोट सुटलं नसेल अशा फारच कमी व्यक्ती दिसतात. त्याला कारणीभूत आहे सध्याची लाईफस्टाईल. हवं त्या वेळी वाट्टेल ते खाण्याची सवय अनेकांना इतकी लागली आहे. की, कधीकधी ते तत्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन करत आहेत हे देखील विसरुन जातात. मग पोट कमी करण्यासाठी काय खाऊ आणि काय नको असा प्रश्न नेहमीच अनेकांना पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही काही असे पदार्थ खाता ज्यामुळे तुमचे पोट सुटू शकते. हे पदार्थ खाल्ले तर काय फरक पडतो असे तुम्हाला वाटत असेल तर हेच काही पदार्थ तुमचे पोट वाढवू शकतात आता हे पदार्थ कोणते ते देखील पाहुया.
4 वर्षांपूर्वी -
पोळ्या (चपात्या) फुलत नाही? | मग पीठ मळताना ही ट्रीक नक्की वापरा - नक्की वाचा
पोळ्या (चपात्या) तर रोज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण प्रत्येक जण वेगळ्या पोळ्या बनवत असतं. काही जणांना गोलाकार आणि मऊ पोळ्या बनवता येत नाहीत. कितीही प्रयत्न केले तरी पोळ्या गोलाकार होतात पण मऊ होत नाहीत असंही काही जणांच्या बाबतीत घडतं. खरं तर गोल आणि मऊ पोळ्या (chapati) बनवण्याची खास टेक्निक आहे. सगळ्यांनाच ती जमते असं नाही. पण तुम्हाला कायम अशा पोळ्या बनवायच्या असतील तर आमच्याकडे नक्कीच त्याच्या काही खास टिप्स आहेत ज्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोळीचे पीठ आणि पाण्याचे प्रमाण. हे अतिशय योग्य असायला हवे. तसेच ही कणीक जास्त वेळ तुम्ही तिंबून ठेवाल तितकी अधिक चांगली.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बहुगुणी चंदन टिळा कपाळावर का लावतात? - वाचा सविस्तर
आपण खूप लोकांना कपाळावर चंदन लावताना पाहतो. विशेषतः भारतातील काही प्रांतांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी कपाळाला चंदनाचा टिळा लावण्याचा प्रघात आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. याचा मन प्रसन्न करणारा मंद सुवास हे एक कारण आहेच, पण त्याशिवाय याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
4 वर्षांपूर्वी -
Health First | चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करा - वाचा सविस्तर
सुंदर आणि चमकदार चेहरा कोणाला नको असतो. त्वचेला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. यामुळे आपली त्वचा नेहमीसाठीच चांगली राहते. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी पैसे आणि वेळही लागत नाही. आज आम्ही तुम्हाला सुंदर त्वचा होण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | हाडजोड वनपस्तीचे बहुगुणी आरोग्यदायी फायदे माहित आहेत का? वाचा सविस्तर
हाडजोड ही मांसल खोड व पाने असलेली वेल समान झुडूप वर्गीय वनस्पती असून यांच्या खोडाचा व पानांचा उपयोग होतो. हाडजोड मॅग्नेशियम, कॅलसियम, क जीवनसत्त्वे, फ्लावोनाईड्स यांचे विपुल भांडार आहे. या वनस्पतीला कांडवेल, हाडजोडी, अस्थिसंधान, त्रिधारी, चौधरी असे देखील म्हणतात.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या | पंतप्रधान मोदींना आठवलं 'अयोध्या विकास मॉडेल'
अयोध्याच्या विकासासाठी बनवलेल्या व्हिजन डॉक्युमेंट्सबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने घेण्यात आली असून सुमारे 45 मिनिटे चालली. या बैठकमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह 13 लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीमध्ये ट्रस्टच्या कोणत्याचा संदस्यांना बोलावले नसल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
RBI'कडून राजकारण्यांना मोठा झटका | बँका ताब्यात ठेवणाऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देशात आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हातात सत्ता असते असं म्हटलं जात. मग त्यासाठी काही लोक बँक साखर कारखाने किंवा पतपेढी आपल्या नावावर करू राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या वृत्तीला आता खुद्द आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी - वाचा फायदे
काळी मऊ गवतावर चालण्याव्यतिरिक्त, माती आणि वाळूवर देखील चालले पाहिजे. सकाळी सुमारे 15-20 मिनिटे गवतावर अनवाणी चालणे, आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गवतावर चालण्याचे बरेच फायदे आहेत. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, यामुळे केवळ दृष्टीच सुधारत नाही, तर तणाव देखील कमी होतो. चला तर, जाणून घेऊया सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे आरोग्यदायी फायदे
4 वर्षांपूर्वी -
Health First | कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे - नक्की वाचा
महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात. कडूलिंबाचे झाड म्हणजे माणसाला निसर्गाने दिलेलं वरदानच आहे. कारण या झाडाची पाने, फळे, फुले, खोड सर्वच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कडूलिंब हे एक औषधी झाड आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून कडूलिंबाचा आर्युवेदात औषधासाठी वापर केला जातो. कडूलिंबाची पाने टाकलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची परंपराही जुनीच आहे. आजकाल वाढत असलेलं इनफेक्शन आणि आजारपण टाळण्यासाठी हा घरगुती उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे काय काय फायदे होतात.
4 वर्षांपूर्वी -
महिलेच्या लैंगिक शोषणामुळे राजीनामा देणारे आ. जारकिहोली फडणवीसांच्या भेटीला | म्हणाले फडणवीस माझे गॉडफादर
कर्नाटकातील विवादित आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकिहोली यांनी आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश जारकिहोली म्हणाले की, मला पुन्हा मंत्री बनण्यात रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली. आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाने मला जो सन्मान दिला आहे तो काँग्रेसमध्ये मला २० वर्षात कधीही मिळाला नाही. काँग्रेस बुडती नौका आहे त्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याचा विचारही करत नाही. मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत होतो परंतु वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार तुर्तास हा निर्णय घेत नाही असं त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, नैराश्यातून हा त्रास देण्याचा प्रयत्न | त्याबद्दल यत्किंचितही चिंता नाही - शरद पवार
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घातले आहे. सुबोध मोहिते यांचा हा पाचवा पक्ष आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना असा राजकीय प्रवास त्यांनी केला आहे. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सुबोध मोहिते हे वाजपेयींच्या काळात केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते. त्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेनेमध्ये बाहेर पडले होते.
4 वर्षांपूर्वी -
नियमांचं उल्लंघन | केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना ट्विटने तासभर लॉगइन करण्यापासून रोखलं
केंद्र सरकार आणि ट्विटरमधील वादाचा पुन्हा एक नवा अंक आज समोर आला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ट्विटवर आपल्याला लॉगइन करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. जवळजवळ तासभर आपल्याला लॉगइन करुन देण्यात आलं नाही. यासाठी अमेरिकेतील कॉपीराईट कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं मला सांगण्यात आल्याचं रवि शंकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनामुळे तोंडाची चव, वास घेण्याची क्षमता गेली? | पुन्हा मिळवण्यासाठी हे उपाय करा
‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ ही कोविड -19 ची प्रमुख लक्षणे मानली जात होती. तथापि, आरोग्य तज्ञ असेही म्हणतात की, ही दोन्ही लक्षणे हंगामी फ्लू किंवा सर्दीमध्ये समान प्रमाणात पाहिली जातात. जर आपल्यालाही अशी समस्या येत असेल तर काही गोष्टी या समस्येमध्ये आराम म्हणून कार्य करू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही खाण्याच्या गोष्टीमधून ‘लॉस ऑफ स्मेल’ आणि ‘लॉस ऑफ टेस्ट’ या समस्येवर लवकरच मात करता येते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL