महत्वाच्या बातम्या
-
Health First | घरातील फ्रीजमधून वास येतोय? | हे करून पहा
हल्ली घरातील ब-याच वस्तूंप्रमाणे फ्रीज हीदेखील चैनीची नव्हे तर गरजेची वस्तू झाली आहे. पण आपल्याकडे त्याकडे खूपच दुर्लक्ष केलं जातं. कित्येक दिवस त्यात उरलेलं जेवण, फळ, मसाले, कडधान्य असं बरंच काही फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. मात्र ते चांगलं ठेवायचं असेल तर फ्रीजही नियमित स्वच्छ ठेवला पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
Health First | ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय | वाचा सविस्तर
ताप येणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. वातावरणामध्ये फरक पडला अथवा थोडं काही इन्फेक्शन झालं तरीही ताप येतो. पण ताप आल्यावर लगेच घाबरून जायची गरज नाही. ताप आल्यावर आपण सर्वात पहिल्यांदा नक्कीच डॉक्टरकडे धावत जात नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण तापावर घरगुती उपाय करण्याकडे लक्ष देतो. ताप आल्यावर घरगुती उपाय काय करायचे हे साधारण घरामध्ये मोठ्या माणसांना माहीत असतं. पण काही वेळा आपल्याला नक्की काय घरगुती उपाय करायचे अथवा ताप येण्याची कारणे काय आहेत याची कल्पना नसते.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश | निवडणुकीत योगी नव्हे तर अखिलेश यांची हवा | बसपाचे ९ आमदार भेटीला
उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या ९ बंडखोर आमदारांनी आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. बसपाचे हे सर्व आमदार आज सकाळी ११ वाजता थेट लखनऊ येथील समाजवादी पार्टीच्या मुख्यालयात पोहचले आणि त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
3 वर्षांपूर्वी -
Health First | या मिठाची किंमत आहे सोन्यापेक्षा जास्त | कारण वाचा ..
मीठ म्हणजे अगदी स्वस्त असा समज असेल तर तो प्रथम दूर करायला हवा. जगात असेही एक प्रकारचे मीठ आहे जे खरेदी करायचे ठरविले तर सर्वसामान्य माणसाला कर्ज घ्यावे लागेल. तरीही हे महागडे मीठ अनेक प्रसिद्ध शेफची प्रथम पसंती आहे.
3 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे | या ठिकाणी 107.53 रुपये लीटर
देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, “मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.’ सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही.”
3 वर्षांपूर्वी -
केवळ नावाने 'अवजड' असणारं खातं मिळण्याची शक्यता | विस्ताराच्या नावाने राज्यात राजकारणाच्या उद्योगासाठी वापर?
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होईल असं सांगितलं जातं आहे आणि त्यातच महाराष्ट्रातून एखाद दोन खासदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल अशी चर्चा आहे. अजूनही अधिकृतपणे यावर कुणी काही बोलायला तयार नाही. पण ज्या दोन नेत्यांचं नाव चर्चेत आहे, त्यातले एक आहेत नारायण राणे आणि दुसऱ्या आहे बीडच्या खासदार प्रीतम मुंडे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु | आरएसएस'च्या मार्गदर्शनाखाली 'सेवा हीच संघटना' अभियान
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारसह भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. आता या खराब झालेल्या इमेजला सुधारण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आरएसएस’च्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्ग भारतीय जनता पक्षाने ‘सेवा हीच संघटना’ नावाचे अभियान सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांना लसीकरण प्रोग्राममध्ये भाग घेण्यास सांगितले आहे.
3 वर्षांपूर्वी -
हिमनद्यांवर विपरित परिणाम होतोय... तर १ अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होईल - IIT संशोधन
हवामान बदलांमुळे हिमालयातील बर्फ अधिक वेगानं वितळत आहे. हिमनद्या संकुचित होत आहेत आणि हिमालय-काराकोरम पर्वतरांगामध्ये हवामान बदलामुळे विविध प्रकारचे धोके निर्माण होत आहेत. हिमनद्या वितळणं थांबल्यास तब्बल एक अब्ज लोकसंख्येला पाणी मिळणं कठीण होऊ शकतं. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) च्या संशोधनात ही धक्कादायक आता बाब समोर आली आहे. आयआयटीचे सहाय्यक प्राध्यापक फारूक आजम संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | यूपीत धार्मिक षडयंत्र? | मुस्लिम वृद्धाला मारहाण, दाढी कापली, जय श्री राम बोलायला लावलं
उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जवळ आल्याने यूपीतील धार्मिक तेढ वाढविण्यास काही विकृतांनी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ‘जय श्री राम’ बोलण्याची सक्ती देखील केली आहे. जबरदस्तीने त्यांना जय श्री राम बोलायला लावलं. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हि़डीओमध्ये काही तरुण वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगाल भाजपमध्ये मोठी फूट | 74 पैकी 51 भाजप आमदारच राजभवनात
प. बंगालमधील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामध्ये मोठी फूट पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यावेळी त्याच्या सोबत 74 पैकी केवळ 51 भारतीय जनता पक्षाचे आमदारच राजभवनात जाऊ शकले. या संपूर्ण घटनेने पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षामध्ये बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Health First | कोरोनावर अँटिबॉडी कॉकटेल प्रभावी औषध आलं | एका दिवसात बाधितांमधली लक्षणं गायब
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर देशातून ओसरतो आहे. अशातच एक चांगली बातमी समोर आली आहे. कोरोनाबाधितांवर मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अँटिबॉडी कॉकटेल असलेल्या इंजेक्शनच्या वापरामुळे 24 तासांत कोरोनाची लक्षणे गायब झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कोरोनाने सारे जग हैराण झाले आहे. कोरोनावर काही औषधं प्रभावी ठरत असल्याचा दावाही केला जातोय. त्यापैकीच अँटिबॉडी कॉकटेलने सर्वांचं लक्ष वेधले आहे. या औषधाचा डोस घेताच पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांमधली लक्षणं गायब झाल्याचा दावा करण्यात येतोय.
3 वर्षांपूर्वी -
Health First | लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करता? आरोग्याचे हे धोके संभवतात
वर्क फ्रॉम होमचे प्रमाण वाढले आहे. लोक तासनतास लॅपटॉप समोर बसलेले असतात. अनेकदा लॅपटॉप मांडीवर ठेवून अनेक तास काम केले जातेय मात्र तुम्हाला हे माहीत आहे की मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नव्हे. लॅपटॉपच्या अधिक वापराने तुमच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच बराच वेळ मांडीवर ठेवून काम केल्यास पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या सतावू शकते. लॅपटॉपला जोडलेले वायफाय कनेक्शन तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | हे 7 पदार्थ पुन्हा गरम करून खाता? | हे वाचा अन्यथा होतील गंभीर आजार
आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. प्रत्येक घरात असं केलंही जातं. पण तुम्हाला कल्पना आहे का? काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास, त्याचा आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. अन्न पुन्हा पुन्हा गरम केल्यास, त्यातील पोषक तत्व नाहीशी होतात हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरीही याबाबतीत लोक जागरूक होत नाहीत. यापैकी काही पदार्थ असेही आहेत जे पुन्हा गरम केल्यास, विषारी पदार्थ होतात. हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
3 वर्षांपूर्वी -
Health First | मायक्रोव्हेवमध्ये अन्न शिजवता? | मग आधी हे वाचा
कधी चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहायला मिळणारे मायक्रोव्हेव ओव्हन आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य भाग बनला आहे. मायक्रोवेवमध्ये जेवण शिजवणं किंवा गरम करणं वेळ वाचवणारं आणि सोपं असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मायक्रोवेव्ह सारख्या विद्युत उपकरणांमुळे आपलं स्वयंपाकघर खरोखरच आधुनिक बनते, पण ते आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | सिक्कीम स्टेट बँकेत भरती | त्वरा करा
बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांना सिक्कीम स्टेट बँकमध्ये अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ सिक्कीमने सहाय्यक व्यवस्थापक पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट statebankofsikkim.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Health First | किडनीस्टोन म्हणजे मुतखड्यावर घरगुती रामबाण उपाय
सर्वात सामान्यत: आढळणारा मुतखड्याचा प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑब्झॅलेट स्टोन्स. त्याचबरोबर कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स, सिस्टिन स्टोन्स, युरिक अॅसिड स्टोन्स हे प्रकार आहेत. मीठ आणि मुत्रातील खनिज पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्याने किडनीस्टोनचा धोका संभवतो. किडनीस्टोनचे प्रकारही वेगवेगळे आहेत. यावर काही प्रमाणात का होईना पण, घरगुती उपायही करता येतात. त्यावरील हा आढावा..
3 वर्षांपूर्वी -
अरेंज मॅरेज करताना ह्या ५ गोष्टींची काळजी घ्या | नाहीतर पुढे पश्चात्ताप करायची वेळ येईल
सध्याच्या लव्ह मॅरेजच्या जमान्यात आजही अनेक जण असे आहेत जे अरेंज्ड मॅरेजवर विश्वास ठेवतात. खासकरून मुली ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य करियरला वाहीलेलं असतं, त्यांना अजिबात प्रेमात पडायला वगैरे वेळ मिळालेला नसतो किंवा आई वडिलांच्या मर्जी विरुद्ध लग्न करायचं नसतं, त्या मुलींची अरेंज्ड मॅरेज करून छानसा जोडीदार निवडायची इच्छा असते. शेवटी लग्न म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय असतो. हा निर्णय चुकला तर सगळं आयुष्य उध्वस्त होऊ शकतो. म्हणूनच त्या आधी काही शहानिशा करून मग सारासार विचार करून निर्णय घेतलेला योग्य!
3 वर्षांपूर्वी -
जीवनात यश आणि घरात लक्ष्मी हवी असेल तर दररोज करा 'ही' कामे | चाणक्य नीती
अशी एकही व्यक्ती सापडणार ज्याला जीवनात यश नको असेल. अनेकजण जीवनात मोठं यश प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे असेल तर आपण काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेकजण आपल्या कार्याविषयी गंभीर नसतो. जीवनातील यशाबद्दल आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीने दररोज चांगले कार्य केले पाहिजे.
3 वर्षांपूर्वी -
गुजरात विधानसभा २०२२ | ‘आप’च्या पक्षविस्तारासाठी मुख्यमंत्री केजरीवाल गुजरातमध्ये
मागील आठवड्यात राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे देशात तिसरी आघाडी निर्माण होण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, त्याच वेळी आम आदमी पार्टीने आगामी गुजरात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांना पहिला धक्का बसला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुशांतसिंहच्या मृत्यूचं सत्य सीबीआयकडूनही गुलदस्त्यात | राज्याला बदनाम करणारे विरोधकही मूग गिळून शांत
मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये बॉलिवू़ अभिनेता सुशांतसिंग राजपूतयाचा मृतहेह वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीसह राजकारणीही हळहळले. यानंतर त्याचा मृत्यू कसा झाला याचा तपास सुरु झाला. ही हत्या होती की आत्महत्या यावरुन राजाकराण सुरु झालं. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासावरून ‘बिहार विरुद्ध महाराष्ट्र’ पोलीस असा सामना रंगला. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंबई पोलिसांविरुद्ध बदनामीचे षड्यंत्र राबविल्याचे समोर येताच, आरोप- प्रत्यारोपांचे राजकारण तापले. मात्र, वर्षभरानंतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS