महत्वाच्या बातम्या
-
कोरोना संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा विचारपूर्वक वापर करा | रेमडेसिविर देण्यावर बंदी - केंद्राच्या गाइडलाइन
केंद्र सरकारने कोरोना संक्रमित मुलांच्या उपचारासाठी नवीन गाइडलाइन जारी केली आहे. या नवीन नियमात संक्रमित मुलांवर सीटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला असून, रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगीना पर्यायी नेतृत्व उभं करण्याच्या हालचाली? | ‘नमामि गंगे’च्या पोस्टरवरूनही मोदी-शहा बाजूला
उत्तर प्रदेशात कोरोना आपत्तीत झालेल्या नाचक्कीमुळे मोदींना देखील लोकसभा निवडणूक महागात पडणार असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. देशभरापासून ते जगभर उत्तर प्रदेशातील घटनांमुळे भाजपवर टीका झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील नैतृत्व योगींवर प्रचंड नाराज आहेत. अगदी फोटोवर देखील योगींपासून अंतर राखण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशात ‘ब्राह्मण’ राजकारणाला देखील सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनामुळे नव्हे तर निवडणुकीतील मोदी-शहांच्या रॅलीमुळे कोरोनाचा फैलाव वाढला - राकेश टिकैत
शेतकरी नेते राकेश टिकैत सध्या पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पत्रकारांशी राकेश टिकैत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
बारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची सध्या खूप चर्चा होत आहे. त्यांच्या दाढीच्या स्टाइलची लोक नोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांच्यासोबत तुलना करत आहेत. पण काही लोक असेही आहेत, ज्यांना पंतप्रधानांच्या दाढीची स्टाइल आवडलेली नाही. यामधून एक बारामतीचा चहावाला देखील आहे. त्याने पंतप्रधानांच्या दाढीवर आक्षेप घेत त्यांना दाढी कट करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मला आनंद आहे की, कोविडमध्ये देशात अनेकांनी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावले - गडकरी
उत्तर प्रदेशात एका ऑक्सीजन प्लांटच्या व्हर्चुअल कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जीभ घसरली. नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले – ‘सर्वात पहिले मला आनंद आहे की, कोविडच्या या काळात आपल्या देशात अनेक लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला.’ सदर संवादात त्यांनी हे वाक्य ००:५८ व्या सेकंदाला म्हटल्याचे तुम्ही पाहू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महावितरण'मध्ये 135 पदांची नवीन भरती
महावितरण भरती २०२१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने एक नवीन अधिसूचना प्रकाशित केली असून १३५ वायरमन, इलेक्ट्रीशियन आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार महावितरण भर्ती 2021 साठी 25 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य चॅनेलद्वारे अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | बीटाचा पाला फेकून देऊ नका | डाएटसाठी आहे परफेक्ट पदार्थ - वाचा सविस्तर
बीट आपण नेहेमीच खातो पण बीटासोबत येणाऱ्या पाल्याचं आपण काय करतो? अनेकजण तर बीट विकत घेताना आधी तो पाला कापून मगच बीट पिशवीत टाकतात? बीटाचा पाला टाकून केवळ बीट खाणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं तज्ज्ञ सांगतात. बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | आरोग्यासाठी लाभदायक गुळपोळी | वाचा सविस्तर
पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही. तुम्ही ही पोळी तयार करताना तूप लावू शकता.
4 वर्षांपूर्वी -
Health First | पापड सुद्धा आहेत आरोग्यदायी | पण त्याआधी ही माहिती समजून घ्या
भारतीय संस्कृती मध्ये अनेक पद्धतीचे लोक राहत असतात आणि भारतीय खाद्य संस्कृती ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि अनेक पदार्थांचा समावेश भारतीय खाद्य संस्कृतीत असतो. आपल्या देशांतील कित्येक भागांत दररोज न चुकता शाकाहारी जेवणाबरोबर पापड खाण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे. पण सर्वात जास्त पापड हे राजस्थान मध्ये खाल्ले जातात ! पण देशभरात सर्वात जास्त आवडणारे आणि लोक ज्यांचे पापड चवीचवीने खातात ते राज्य म्हणजे गुजरात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गाईचे तूप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहे का?
तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुपाचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. शारीरिक प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडाव्यात, यासाठी शरीर लवचिक असणं आवश्यक आहे. यासाठी व्यायामाप्रमाणेच पौष्टिक आहारातील घटक देखील तितकीच महत्त्वाची भूमिका निभावतात. शरीर लवचिक राहण्यासाठी शुद्ध तूप कशा पद्धतीने लाभदायक ठरते.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे प. बंगालचे प्रभारी जितिन प्रसाद यांचा काँग्रेसला प. बंगालमध्ये शून्य केल्यानंतर युपी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे भाजपने देखील मोठा गाजावाजा केल्याचं पाहायला मिळतंय. पण खरं वास्तव दुसरंच आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी, वेळेवर निर्णय न घेतल्याने अनेकांचे मृत्यू - मुंबई हायकोर्ट
कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारलं आहे. सर्जिकल स्ट्राइक कऱण्याची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर जवानांना एकत्र आणत आहात, परंतु, शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. सर्जिकल स्ट्राइक करण्याची तुमची भूमिका असली पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असं देखील कोर्टाने नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | योगींच्या मर्जीतील आणि युपीच्या माजी मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्त पदी वर्णी | केंद्राचा निर्णय
केंद्र सरकारने मंगळवारी उत्तर प्रदेशच्या 1984 बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. याबाबत अधिकृत लेखी घोषणा देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणेज अनुप चंद्र पांडे हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मर्जीतले अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ | युपी भाजपच्या सोशल मीडिया पेजवरून मोदींचा फोटो हटवला
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकून सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशासह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंदेखील लक्ष घातलं आहे. विशेष म्हणजे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या पाश्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपच्या ट्विटर पेजवरून मोदींचा फोटो हटवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपच्या इतर राज्यांच्या सोशल मीडिया पेजवर मोदींचा फोटो असल्याचं स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये भाजप टेन्शनमध्ये | ममता बॅनर्जी मोठा राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत
विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल या आशेनं तृणमूलच्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला. मात्र भारतीय जनता पक्षाला शंभरीदेखील गाठता आली नाही. तर तृणमूलनं २०० हून अधिक जागा मिळवल्या. पुढील पाच वर्ष विरोधात राहून संघर्ष करणं अतिशय कठीण असल्याची कल्पना संबंधित दलबदलूंना आहे.
4 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयात लस | मोदींच्या घोषणेतील दर १५० रुपये | प्रत्यक्ष दर ७८०, १४१० आणि ११४५ रुपये
केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
जगात कुठेही बालकांमध्ये गंभीर संक्रमण नाही | पुढच्या लाटेतही असे होईल याचा पुरावा नाही - डॉ. गुलेरिया
देशात कोरोनाची दुसरी लाट कमकुवत होत असल्याने नवीन रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये बालकांवर वाईट परीणाम होण्याच्या वृत्तादरम्यान सरकारने दिलासादायक दावा केला आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मंगळवारी सांगितले की, भारत किंवा जगातील प्रकरणे पाहिले तर आतापर्यंत असा कोणताही डेटा आलेला नाही, ज्यामध्ये सांगितले असेल की, मुलांमध्ये आता जास्त गंभीर संक्रमण आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मोड आलेली मटकी आहे उपयोगी
मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. तर मग जाणून घेऊयात मटकी खाण्याचे फायदे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मेल मोटर सर्विस मुंबईत 14 पदांची भरती | वाचा सविस्तर
मेल मोटर सर्व्हिस रिक्रूटमेंट २०२१. कम्युनिकेशन मंत्रालय व पोस्ट ऑफ आयटी विभागांतर्गत असलेल्या मेल मोटर सर्व्हिसची अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित झाली आहे आणि अॅप्रेंटिस पोस्टसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमएमएस भरती 2021 साठी 23 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात
4 वर्षांपूर्वी -
Health First | पचनक्रिया सुधारण्यास गुणकारी आहे कोबी | वाचा सविस्तर
कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे. कोबी हा पदार्थ फायटोकेमिकल्सचा संग्रह आहे. हे संयुगे एंटीऑक्सीडेंट आहेत आणि कोबीमध्ये सापडलेला विद्राव्य फायबर सह रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास प्रभावी आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती