महत्वाच्या बातम्या
-
व्हॅक्सीन वाटपासाठी एका राज्यापेक्षा दुसऱ्या राज्याला प्राथमिकता दिली जात आहे? - सुप्रीम कोर्ट
कोरोना महामारीच्या आजारात ऑक्सिजनची कमतरता व यंत्रणेतील कमतरता या मुद्दय़ावर शुक्रवारी सर्वोच्य न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सरकारला सांगितले की, ‘आम्हाला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की जर एखाद्या नागरिकाने सोशल मीडियावर आपली तक्रार नोंदवली तर ही माहिती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. आम्हाला माहितीसंदर्भात कोणताही कठोरपणा नको आहे. अशा तक्रारींवर कारवाई करण्याची वेळ आल्यास आम्ही त्यास अवमानकारक मानू असं सर्वोच्य न्यायालयाने म्हटलं.
4 वर्षांपूर्वी -
मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनामुळे निधन
मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारा मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन झालं. जगदीश अवघ्या ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीशच्या निधनाने बॉडीबिल्डिंग विश्वात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ज्येष्ठ पत्रकार आणि लोकप्रिय अँकर रोहित सरदाना यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुधीर चौधरी यांनी सरदाना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वेदना किंवा ताप असेल तर पेन किलर खाणे टाळा, कोरोना असल्यास गंभीर होऊ शकतो रुग्ण - ICMR चा इशारा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दररोज देशातील मागील २४ तासांतील रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी जाहीर केली जाते. गुरुवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. देशवासीयांना काळजीत टाकणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काहीसा दिलासा देणारी एक बाब म्हणजे २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अल्सर म्हणजे काय ? तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या । नक्की वाचा
अल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा होय. जेव्हा हे घाव आतड्यांत किंवा अन्न नलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना वा पिताना खूप वेदना होतात आणि मोठा त्रास होतो. चावलेला कोणताही पदार्थ गिळताना सुद्धा अशी जाणीव होते जसे की काहीतरी आपला गळा चिरून आतमध्ये शिरत आहे. या स्थितीत रुग्ण साधं पाणी पिताना सुद्धा घाबरतो. कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अल्सरच्या आजराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणाऱ्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणाऱ्या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातसाहित अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम लांबणीवर | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे तीन दिवस कोरोना लसीकरण केले जाऊ शकणार नाही. येथे 2 मेपर्यंत लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. BMC ने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, ‘लसीच्या कमतरतेमुळे पुढच्या तीन दिवसांपर्यंत मुंबईमध्ये व्हॅक्सीनेशन करणार नाही.’ तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन असलेल्या राज्य व शहरांमध्ये IPL सुरु, कारण IPL अमित शहांचा मुलगा ऑपरेट करतो - काँग्रेस
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
ही कसली घमेंड आहे, की तुम्ही लोकांसमोर स्वतःच अपयश स्वीकारण्यास तयार नाही - नरेंद्र मोदी
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
देशात 24 तासांमध्ये 2.91 लाख लोक बरेही झाले | तर 3501 रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
Exit Poll 2021 | पश्चिम बंगालमध्ये ममता राज, तर तामिळनाडूत एनडीए'ला धक्का देत DMK सुसाट जाणार
पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी आठव्या टप्प्यातील मतदानासोबतच ५ राज्यांच्या निवडणुकांची सांगता झाली. निकालांसाठी २ मेची वाट पाहावी लागेल. कारण, गुरुवारी मतदानानंतर समाेर आलेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्येही निकालांवर एकमत नाही. ४ माेठ्या संस्थांच्या पोलपैकी २ पोल ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला, तर एका एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमताचा अंदाज आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने तर दोन्ही पक्षांना जवळपास सारख्या जागा देत दोघांनाही बहुमत दर्शवले आहे. म्हणजे बंगालच्या मतदारांनी यंदा एक्झिट पोल संस्थांकडेही आपली ‘मन की बात’ सांगितलेली नसल्याचे दिसते. खरा निकाल २ मे रोजीच लागणार आहे. भाजप व तृणमूलने एक्झिट पोल्स आपल्याच बाजूने असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | डिंकाचे पदार्थ आपल्या आरोग्यास लाभदायक । नक्की वाचा
थंडीच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या टाईमटेबलमध्ये बरेच बदल होतात. या दिवसांमध्ये उष्णपदार्थ आवर्जून खावे असा सल्ला आवर्जून दिला जातो. यामुळे शरीराला उर्जा तर मिळतेच त्यासोबतच अनेक आजारांपासूनही रक्षण होते. याच कारणामुळे थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू बनवले जातात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि आरोग्यही चांगले राहते. तसंच डिंक भाजूनही खातात. अशाप्रकारे डिंक खाल्ल्यास हाडंही मजबूत होतात आणि थंडीच्या दिवसात दुखत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
घाबरुन थेट रुग्णालयांमध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही | अनेक रुग्ण घरीच बरे होऊ शकतात - केंद्रीय आरोग्यमंत्री
जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दाहकता | कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी कर्नाटक सरकारकडून बेंगळुरूजवळ 230 एकर जमीन
जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, जगात गेल्या चोवीस तासांत 8 लाख 85 हजार 604 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 15 हजार 284 लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील 17 देशांमध्ये भारतीय विषाणूचा स्ट्रेन आढळून आला असल्याचे म्हटले आहे. डब्ल्यूएचओने याला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ (VOI) घोषित केले असून B.1.617 या डबल म्यूटेंट व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | गुणकारी लसणाचा आपल्या आहारात करा समावेश । सविस्तर वाचा
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे.हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे.दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे….
4 वर्षांपूर्वी -
देशात अजून कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता, सज्ज राहा - नितीन गडकरी
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | नाकातून रक्त आल्यास काय करावे उपाय पहा । नक्की वाचा
नाकाच्या आतल्या बाजूला एक विशिष्ट प्रकारची कातडी असते. या पातळ त्वचेला ‘म्युकोझा असं म्हणतात. म्युकोझा मुळातच नरम असल्यामुळे त्याला थोडासा धक्का लागला किंवा जखम झाली तरी लगेच त्यातून रक्त यायला सुरूवात होऊ शकते. आपलं नाक नेहमी थोडं ओलसर राहावं यासाठी नाकात निसर्गत:च पातळ पदार्थ बनण्याची व्यवस्था असते. उन्हाळ्यात मात्र नाकातला ओलसरपणा कमी होऊन नाक आतून कोरडं पडतं. नाकाच्या आतल्या त्वचेला अगदी लागून रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. त्यामुळे ही त्वचा कोरडी झालेली असताना चुकून नाक- तोंड कुठे आपटलं गेलं किंवा कुणाला नाकात बोट घालून नाक कोरण्याची सवय असेल तर त्यामुळेही रक्तवाहिनी फुटते आणि नाकातून रक्त येतं.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खोटं बोलले म्हणून फेसबुकने त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं | तर भारतीय सत्य बोलले म्हणून #ResignModi....
देशात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे आणि लाखो लोकं आजपर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडली आहेत. त्यानंतर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करण्यात येत आहेत. ट्विटर आणि फेसबुक युजर्स #ResignModi हा हॅशटॅग चालविण्यात येत होता. मात्र, 28 एप्रिल रोजी फेसबुकने हा हॅशटॅग काही काळासाठी ब्लॉक केला.
4 वर्षांपूर्वी -
Health First | खोकल्यावर करा हे घरगुती उपचार । नक्की वाचा
:बदलत्या वातावरणात किंवा थंडीत लहान मुलांना खूप सहज व लवकर सर्दी-खोकला होऊ शकतं.खोकला येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे संक्रमण होय. व्हायरल इन्फेक्शन जसे की सर्दी आणि ताप यामुळे खोकला येतो. एसिड रिफ्लक्स हे एक खोकल्यासाठी कारणीभूत ठरू शकते.अस्थमा सुद्धा खोकल्यामागचे कारण आहे. त्याचे निदान करणे कठीण असते कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये वा बाळामध्ये याची लक्षणे वेगवेगळी दिसतात. परंतु अशी काही लक्षणे आहेत जी अस्थमासाठी सामान्य मानली जातात जसे की खोकताना घरघर आवाज येणे, खासकरून रात्रीच्या वेळी जास्त जोरात खोकला येणे. अॅलर्जी आणि साइनसाइटिस सुद्धा खोकल्याची कारणे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाचं अज्ञान | म्हणाली.. केंद्र सरकार मोफत लस देतंय आणि महाराष्ट्र सरकार स्वतःचा प्रचार करतंय
देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. राज्यांकडे १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यासाठी लसच उपलब्ध नाहीय. कालच महाराष्ट्र सरकारने ६००० कोटीची तरतूद करून १८ ते ४४ वयोगटातील सर्वाना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान काल कोविन अॅपवर नोंदणी केल्यानंतरही लसीकरणाचा स्लॉट केवळ ४५+ असाच दाखवत होता.
4 वर्षांपूर्वी -
नियम बनवताना बुद्धीचा अजिबात वापरच नाही, लोकांनी मरत रहावं असंच केंद्राचं धोरण - न्यायालयाने झापले
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS