महत्वाच्या बातम्या
-
गुजरात | इशरत जहां एनकाउंटर | क्राइम ब्रांचच्या 3 अधिकाऱ्यांची निर्दोष सुटका
गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी CBI कोर्टाने क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने म्हटले की, इशरत जहां, लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी असल्याच्या गुप्त रिपोर्टला नाकारता येत नाही. यामुळेच या तीन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंथरुणाला खिळलेल्यांना, अपंगांना घरी लस देण्याचा बीएमसीचा प्रस्ताव फेटाळला | नेपाळला ११ लाख डोस
भारतीय लष्कराने नेपाळ सैन्याला एक लाख कोरोना वॅक्सिन डोस भेट दिली आहे. नेपाळच्या त्रिभुवन विमानतळावर वॅक्सिन पोहोचवताच नेपाळी सैन्याने स्वागत केले. भारतीय सैन्य आणि नेपाळ यांच्यातील संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. यापुर्वी नेपाळमध्ये भारतीय लष्कराच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
भारतात झालेल्या कोरोना लसीकरणापेक्षा अधिक लसी मोदी सरकारने निर्यात केल्या आहेत हे...
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या नेत्यावर सैन्यातील जवानाच्या पत्नीकडून बलात्काराचा आरोप | नेता फरार
भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल देशात सर्वांनाच आदर असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सीमेवर जवान शहीद झाल्यास जवानांच्या पत्नीला वीरपत्नी असं संबोधलं जातं. मात्र दुर्दैवाने त्यादेखील विकृत लोकांच्या वासनेच्या बळी ठरत आहेत. तसा धक्कादायक प्रकार घडला आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्याकडूनच आणि त्यामुळे सर्वत्र संताप असल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात... त्या भेटीच्या वृत्तावर शहांनी संधी साधली?
काही गोष्टी सावर्जनिक करायच्या नसतात, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीवर सूचक उत्तर दिलं आहे. दिल्लीत पत्रकारांनी पवारांसोबत भेटीबाबत छेडलं असता अमित शाहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाहीत, असं सांगून प्रश्न उडवून लावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकराच्या समीकरणात काही बदल होणार का? राजकीय खेळी पलटणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPS लॉबीचा मुद्दा कुचकामी ठरल्याने 'त्या' भेटीबाबत माध्यमातून पुड्या? | राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची वृत्त त्यानंतर वेगाने पसरली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आंदोलक शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट | भाजप आमदाराला नग्न करून चोप
मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, सध्या शेतकऱ्यांच्या संताप अनावर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर हल्ला केला. विशेष म्हणजे त्यांचे कपडेही फाडत चोप देण्याचा प्रयत्न देखील झाला. संतापलेल्या शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनातही केवळ निवडणुका? | मन की बात'मध्ये त्या राज्यातील लोकांचे विशेष कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमातून देशातील नागरिकांना संबोधित केले. मन की बातच्या 75 व्या आवृत्तीत पंतप्रधान मोदींनी गेल्या वर्षी लावलेल्या जनता कर्फ्यूचा उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, पहिल्यांदाच देशातील लोकांनी जनता कर्फी हा शब्द ऐकला आणि हा शब्द जगासाठी आश्चर्यचकित ठरला. यावेळी मोदींनी कोरोनाविरूद्धच्या लढण्यासाठी ‘दवाई भी-कड़ाई भी’ या मंत्राचा पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यावरून महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या केंद्राकडून परदेशात सर्वाधिक पुरवठा
देशात कोरोना संक्रमणानं पुन्हा एकदा वेग घेतलेला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून समोर येत आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारवर लसीकरण आणि लस पुरवठ्यावरून बेजबाबदारपणाचा आरोप केला होता. राज्याला पुरवण्यात आलेल्या लसीच्या डोसपैंकी ५६ टक्के लसीचा वापरच करण्यात आलेला नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
संतापजनक | भारतीयांना नव्हे...तर मोदी सरकारकडून परदेशात सर्वाधिक लसीचा पुरवठा
देशात कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस भयावह होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी 62,276 नवीन रुग्ण आढळले. 30,341 बरे झाले आणि 292 जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त वाईट परिस्थिती महाराष्ट्राची आहे. येथे एका दिवसात 36,902 संक्रमित आढळले. हा आकडा 11 सप्टेंबरला आलेल्या पहिल्या सर्वोच्च स्तरापेक्षाही दीडपट जास्त आहे. तेव्हा येथे 24,886 प्रकरणे समोर आली होती.
4 वर्षांपूर्वी -
Health First | सब्जा बिया खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय शिक्षण! मोदी बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत - शशी थरूर
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात माझाही सहभाग होता | ते माझे पहिले आंदोलन होते - पंतप्रधान
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंहांच्या पत्नी 5 कंपन्यांमध्ये डायरेक्टर | TRP प्रकरणानंतर LIC हाउसिंगच्या बोर्डवरुन हटवलं
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांकडून आज भारत बंदची हाक | अनेक ठिकाणी जोरदार निदर्शनं
केंद्र सरकारच्या ३ नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमांवर हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आता १२० दिवस पूर्ण होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने आज (२६ मार्च) भारत बंदचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अहवालात वस्तुस्थिती पूर्ण भिन्न | म्हणजे फडणवीसांनी त्याचा उपयोग देशभर संभ्रम निर्माण करण्यासाठी केला?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुगलला सर्व कळतं | Google च्या मते Unworried' चा अर्थ 'अविवाहित'
सध्याच्या आधुनिक जगात इंटरनेटच्या कृपेमुळे लहान सहान गोष्टींसाठी एका क्लिकवर सहज तुमच्या मनातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. इंग्रजी मधून मराठी, हिंदी ते जगभरातील अनेक भाषेत वाक्य भाषांतरीत करण्याची सोय आहे. पण “unworried” हा शब्दाचा अर्थ गूगलच्या डिक्शनरी मध्ये काही भलताच आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सचिन वाझे आणि मनसुख 17 फेब्रुवारीला CST स्टेशनच्या बाहेर भेटले
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कड्या जोडणारे एक CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसतेय की, 17 फेब्रुवारीला वाझे आणि मनसुख यांची भेट झाली होती. CCTV फुटेज CST रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे आहे. आता तपास यंत्रणांनुसार, या भेटीदरम्यानच मनसुखने स्कॉर्पियोची चावी वाझेला सोपवली होती.
4 वर्षांपूर्वी -
आरक्षणाच्या मर्यादेत होऊ शकतो बदल? मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग 9 व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. या खटल्याची सुनावणी पाच न्यायाधीशांचे घटनात्मक खंडपीठ करत आहे. महाराष्ट्रातील नवीन आरक्षण प्रणालीत जन्मलेली ही बाब आता देशातील सर्व राज्यांच्या आरक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. यामुळे कोर्टाने सर्व राज्यांना या प्रकरणात आपला खटला मांडायला नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झारखंड सरकारची बाजू मांडली आहे आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाला आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असू शकते का याचा निर्णय घ्यावा लागेल.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS